congress mla kailsh gorantyal news jalna
congress mla kailsh gorantyal news jalna 
राज्य

संसर्ग झालेल्या कोरोना योद्ध्यांचा द्वेष करु नका, अन्यथा आपण जगू शकणार नाही..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी आपले घरदार, कुटुंबिय, नातेवाईकांपासून दूर राहत आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस अधिरारी, कर्मचारी, प्रशासनातील लोक रात्रंदविस काम करत आहेत. अशावेळी यातील अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. पण संसर्ग झालेल्या कोरोना योद्ध्यांना त्या त्या भागीतील, सोसायट्यांमधील लोक रुग्णालयात काम करू नका, इथे राहू नका असे म्हणत त्यांच्या द्वेष करतांना दिसत आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट असून आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन जालन्याचे कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.

जालना येथील डॉ. संजय राख यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून यामध्ये संसर्ग झालेल्या कोरोना योद्ध्यांशी लोक कशा वाईट पध्दतीने वागतायेत याबद्दल नाराजी आणि खंत व्यक्त केली होती. आमदार गोरंट्याल यांनी याच व्हिडिओचा संदर्भ देत जालनेकरांना आवाहन केले आहे. कैलास गोरंट्याल म्हणाले, कोरोना महामारीचा धोका हा केवळ भारत किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ही जागतिक महामारी आहे. आपल्याकडे या जीवघेण्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनातील सगळ्याच विशेषतः आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्स आणि सफाई कर्मचारी वर्ग आपला जीव धोक्यात घालून आपले प्राण वाचवण्यासाठी झटत आहेत. 

हे करत असतांना अनेक डॉक्टर, नर्स, नगरपालिकेचे सफाई कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तरी देखील न डगमगता हे सर्व लोक कोरोनाशी दोन हात करत आहेत. पण संसर्ग झालेले लोक ज्या कॉलनी, सोसायटीत राहतात, तेथील नागरिक या कोरोना योद्ध्यांना कामावर जाऊ नका, इथे राहू नका, असे सांगत असल्याचे डॉ. राख यांच्या पोस्टवरून समोर आले आहे. नागरिकांचे हे वागणे अत्यंत चुकीचे आहे. जे आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून एखाद्या सैनिका प्रमाणे या संकटात काम करत आहे, त्यांच्या बद्दल आपण द्वेष भावना न ठेवता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

उद्या, जर यो कोरोना योद्ध्यांनी काम केले नाही, तर मला नाही वाटत तुम्ही आम्ही जास्त दिवस जगू शकू. तेव्हा ही वेळ कुणाचा द्वेष करण्याची नाही, तर त्याला समजन घेऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आहे. मी जालन्यातील जनतेला या कोरोना योद्ध्यांना खंबीर साथ देण्याचे आवाहन करतो आहे,  असेही गोंरट्याल यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT