shankarrao gadakh.jpg
shankarrao gadakh.jpg 
राज्य

गडाखांच्या प्रयत्नातून हटली शनिशिंगणापुरातील राजकीय साडेसाती

विनायक दरंदले

सोनई : शनिशिंगणापुर गावात गेल्या अनेक वर्षापासून देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत असलेल्या राजकिय संघर्षाची साडेसाती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून हटली आहे. या 'एकोपा एक्सप्रेस'चे परिसरात स्वागत होत आहे.

घरांना दरवाजे व कडी कुलुपाचा वापर होत नसलेल्या या गावात देवस्थान विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत अनेक वर्षापासून टोकाचे राजकारण चालत होते. गावातील सर्वच प्रमुख पुढारी एकमेकांचे नातेवाईक असतानाही दोन्ही संस्थेतील खुर्ची नेहमीच
कळीचा मुद्दा ठरत आलेली आहे. येथील सेवा संस्था व ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच गाजली मात्र दोन्ही संस्थेवर बापुसाहेब शेटे यांचेच राज राहिलेले आहे.

शनिशिंगणापुर गाव लहान असले, तरी तालुक्यातील निवडणुकांत याच गावाची चर्चा अधिक होत होती. गाव व परिसरातील विकास काम डोळ्यासमोर ठेवून जलसंधारण मंत्री गडाख यांनी कट्टर विरोध बाजुला ठेवत ग्रामपंचायत गट प्रमुख बापुसाहेब शेटे यांना मुळा कारखान्याच्या संचालक मंडळात संधी देत दोन्ही गटात समझोता घडवून आणला. गेल्या अनेक वर्षापासून गावात असलेले दोन राजकिय गट आता एका छताखाली आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मिले सुर मेरा- तुम्हारा

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या पंचावन्न वर्षाच्या इतिहासात प्रथमच गावातील सर्व आडनावाच्या व्यक्तींना नवीन विश्वस्त मंडळात संधी देण्यात आल्याने
मंत्री गडाखांचे कौतुक होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातूनही याचे काैतुक होत आहे.

Edited By - Murlidhar Karale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT