Mohan Joshi - Murlidhar Mohal
Mohan Joshi - Murlidhar Mohal 
राज्य

या काळात मोहन जोशींनी आधी घरातून बाहेर पडावं, लोक त्यांना विसरलेत...

राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे : पुण्याचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी कधीतरी मुंबईला जावं... कधीतरी त्यांच्या नेत्यांना भेटावं… पाच वर्षांनी एकदाच जोशी साहेब आम्हाला दिसतात. गेली वर्ष सव्वा वर्षाच्या काळात ते घरातून बाहेर पडले नाहीत. अशा लोकांनी, मला असं वाटतं की, टीका करण्यापेक्षा, तुम्ही बाहेर या, आम्हाला सूचना करा, मार्गदर्शन करा. आम्ही आपले ऐकू. पण राजकारण करू नका. असे उत्तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. लोक त्यांना विसरले असल्याचा टोलाही महापौरांनी हाणला. 
 
जोशी यांनी काल भाजपवर टीका करताना म्हटले होते की, केंद्रात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून 
कोरोना नियंत्रणासाठी खासदार गिरीश बापट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारकडून पुण्याला जास्तीत जास्त सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे. केंद्राकडून वैद्यकीय सामग्री मिळाल्यावर त्याचे वितरण व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या दोन्ही आघाड्यांवर ठोस काम न करता केवळ राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत असल्याचा ठपका ठेवणे आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देणे, ही कृती म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असेही जोशी यांनी म्हटले होते.

भाजपच्यावतीने शिवणे येथे रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी महापौर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मोहोळ म्हणाले, कोरोनाच्या या परिस्थितीत खरं तर ही राजकारण करण्याची वेळ नाही. आज सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि मी आवर्जून जोशी यांना सांगेन फक्त प्राथमिक आरोग्य सुविधा देणे इतकेच महानगरपालिकेचे काम असतं. पण सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी ही सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असते. 

राज्याआज जोशी यांचेच सरकार राज्यामध्ये आहे. येथे टीका टिपणी करण्यापेक्षा त्यांनी राज्य सरकारकडून महानगरपालिकेला, पुणेकरांना काय आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न करावेत. पुण्यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व रेमडिसिव्हर यांचा तुटवडा आहे.त तुमचे सरकार आहे. पुणेकरांसाठी काही तरी आणा. जोशी साहेब मोठे आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. गेली अनेक वर्षे या शहरांमध्ये ते काम करत आहेत. पण गेली वर्षभर लोक मोहन जोशी साहेब कोण आहे ते विसरले आहेत, असा टोला मोहोळ यांनी लगावला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT