Prafull Patel
Prafull Patel 
राज्य

प्रत्येकाच्या मागे ईडी लागलेली आहे, सामना करू : प्रफुल्ल पटेल

Abhijeet Ghormare

भंडारा : सध्या कोणती चौकशी कोण, कुठे कशी लावत आहे, ते काही कळत नाही. एक मात्र खरं की सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल, असे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आणि पुणेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे पटेल चांगलेच संतापले आहेत. परकीय चलनाविषयीच्या फेमा कायद्यांअंतर्गत विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयात तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 

धानाला ७०० रुपये बोनस
सरकारने धानाला ७०० रुपये बोनस यावर्षीही दिला आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे आनंद आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेच्या हिताची धोरणे भविष्यातही राबविणार आहे. धानाच्या बाबतीत ज्याप्रमाणे निर्णय झाला त्याचप्रमाणे कर्जमाफी आणि इतर मुद्यांवरही सरकार निर्णय घेणार आहे. मागील भाजप सरकारच्या काळात त्यांनी केलेली पापे आमची सरकार धुऊन काढत आहे.  
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT