eknath khadse
eknath khadse 
राज्य

मी विधीमंडळ सदस्य नसल्याने बैठकीला गेलो नाही: खडसे

कैलास शिंदे

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आज मुंबईत आहेत. परंतु भाजप विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीस ते अनुपस्थित असल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत थेट त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विधीमंडळ नेता निवडीची बैठक आहे.कोअर कमेटीची बैठक नाही , त्यामुळे आपण त्या बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित नव्हते , असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


भाजप विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पराभूत उमेदवारही उपस्थित आहेत. परळी विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या बैठकिस उपस्थित होत्या . मात्र या बैठकीस पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे अनुपस्थित असल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. खडसे हे भाजप कोअर कमेटीचे सदस्य आहेत. ते या बैठकीला उपस्थित राहणे आवश्‍यक होते. विशेष म्हणजे खडसे हे आज मुंबईतच आहेत. 


याबाबत 'सरकारनामा'ने थेट एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, आजची बैठक ही विधीमंडळ नेता निवडीची बैठक आहे. आपण विधीमंडळ सदस्य नसल्यामुळे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणे गरजेचे व आवश्‍यकही नाही. त्यामुळे आपण बैठकीला गेलेलो नाही. मात्र जर ही कोअर कमेटीची बैठक असती, तर आपण या बैठकीला अवश्‍य गेलो असतो.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT