Chandrakant Patil.
Chandrakant Patil. 
राज्य

येवढ्या लवकर ही निवडणूक अपेक्षित नव्हती : चंद्रकात पाटील

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अचानक घोषीत झाली. येवढ्या लवकर ही घोषणा होणं अपेक्षित नव्हतं. ही निवडणूक पुढील वर्षी मार्च महिन्यात अपेक्षित होती. कारण मतदारांची यादी अद्याप आलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला यासंदर्भात निवेदन दिले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज येथे म्हणाले. 

श्री पाटील दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. दुपारी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या समीर ठक्करबाबत राज्य सरकारची दंडुकेशाही सुरू असल्याचा आरोपही पाटलांनी यावेळी केली. एका बाजूला जंगल वाचविणे आणि दुसऱ्या बाजूला मिठागरावर घाला घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. कांजूर मार्गची जागा मिठागराची आहे. त्या जमिनीवर घाव घालून मेट्रो कारशेड बनविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण, मिठागार संपविणे हा देखील पर्यावरणाला धोका आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य, असा संघर्ष निर्माण झाला आहे. याबाबतच चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली.  

काय आहे कांजूर मार्ग प्रकरण ?
केंद्र सरकारने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. कांजूरमार्गची जागा मिठागराची असून, त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. 'एमएमआरडीए'ने यापूर्वीही या जागेवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. आता या जागेवर परस्पर कारशेड उभारले जात असून, ते चुकीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. याबाबत तातडीने हस्तक्षेप करीत 'एमएमआरडीए'ने सुरू के लेले कारशेड उभारणीचे काम थांबवावे. ही जागा 'एमएमआरडीए'ला हस्तांतरीत करण्याचा आदेश रद्द करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगावे, असे केंद्राकडून राज्याला आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.             (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT