Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation News 
राज्य

पाॅझीटीव्हीटी दर १.१५ तरीही कोरोना चाचण्या वाढवा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : कोविड विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढविण्यावर अधिक भर द्यावा, (Even if the positivity rate is 1.15, increase the corona tests on the background of the third lot.) अशा सूचना मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड उपाय योजनांबाबतच्या आढावा बैठ पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, ( Municipal Commisnor Astikkumar pandey, Aurangabad) निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

कोविड प्रतिबंधात्मक लसी प्रशासनाकडे उपलब्ध होताच, तत्काळ त्या नागरिकांना द्याव्यात. लसीचा साठा शिल्लक राहणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. लसीकरणासाठी आवश्यक असलेले नियोजन काटकोरपणे करावे.   जिल्ह्याचा १६ जुलै ते २२ जुलै दरम्यान १.१५. टक्के बाधित दर आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे अत्यावश्यक आहे.

त्याचबरोबर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचीही प्राधान्याने काळजी घेण्यात यावी. या रुग्णांच्या उपचारात आवश्यक असलेल्या औषधी, त्यांची उपलब्धता याबाबत खबरदारी घ्या अशा सूचना देखील पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील कोविड चाचण्या, पॉझिटिव्हीटी दर, खाटांचे व्यवस्थापन, ऑक्सीजन साठा, कोविड लसीकरण आदींबाबतही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT