Bacchu Kadu.
Bacchu Kadu. 
राज्य

सर्वांचे लक्ष्य आहे कोरोना, इकडे मात्र सुरू आहे भलताच रोना...

जयेश गावंडे

अकोला : अकोला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रुग्णांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. याची माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांना मिळाली. त्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली असता. अनेक गंभीर बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. यासाठी जबाबदार असलेल्या तेथील व्यक्तीला त्यांनी विचारणा केली असता तो खोटा बोलत होता. हे बघून पालकमंत्र्यांचा पारा भडकला आणि त्यांनी तेथेच त्याच्या कानशिलात लगावली. 

यावेळी बच्चू कडू म्हणाले, कोणत्यातरी आजाराने ग्रस्त लोक येथे येतात. ते आधीच आजारी असतात. त्यामुळे त्यांना चांगले पोषण होईल, असा आहार येथे मिळणे अपेक्षित आहे. पण येथील परिस्थिती एकदमच उलटी आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण रुग्णांना दिले जाते. रुग्णांच्या बाबतीत जी गंभीरता, संवेदनशीलता असायला हवी, ती येथे अजिबात नाही. गरीब रुग्णांच्या जेवणाच्या विषयातही लोक भ्रष्टाचार करण्याचे मार्ग शोधतात, ही शरमेची बाब आहे. सगळा गोंधळच गोंधळ आहे. कुणाकडेही धड उत्तर नाही, वर्षभराचे स्टॉक रजिस्टर असायला पाहिजे, ते सुद्धा नाही. 

खानसामाला विचारले असता, तो सांगतो की ६ किलो तूर डाळ पाहिजे. अन् कानाखाली आवाज काढल्यावर सांगतो की, १० किलो पाहिजे. येथे जो कारभार सुरू आहे, त्याला अधीक्षक, ठेकेदार आणि क्लार्क तिघेही जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करू आणि कारवाई करू. यांचे वरिष्ठ अधिकारी सर्व सुस्तावले आहे. कोरोनाच्या नावाखाली सगळा गोंधळ करून ठेवलाय. सर्वांचे लक्ष्य आहे कोरोना, अन् येथे सुरू आहे भलताच रोना. आज आम्ही बघायला आहो होतो की, रुग्णांना जेवण कुठून उपलब्ध होते. पाहिले तर गोदामात काहीच नाही. साधं रजिस्टरही ठेवलेले नाही. मागणी केलेली आहे ६ क्विंटलची आणि दिले गेले केवळ २ क्विंटल धान्य. ठेका निघतो मुंबईवरून त्यामुळ ठेकेदाराला सर्व गैरप्रकार करायला मुभा मिळत असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT