माजी खासदार राजू शेट्टी मुलगा सौरभसह रमले शिवारात 
राज्य

बऱ्याच दिवसांनंतर माजी खासदार राजू शेट्टी मुलगा सौरभसह रमले शिवारात

संपत मोरे

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सकाळी आपल्या घरातील ऑफिसच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर दुपारी जनावरांचा गोठा स्वच्छ केला. गाई, वासरू धुतले. त्यानंतर ते शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले. 

राजू शेट्टीनी अनेक दिवसांनी घरात आणि शिवारात वेळ घालवला. तसेच सोशल मीडियावरही त्यानी काही काळ घालवला.

खासदार राजू शेट्टी यांनी आज सकाळपासून घरात थांबणे पसंत केले. घरातील ऑफिसची आवराआवर केल्यानंतर त्यांनी जनावरांचा गोठा धुवून काढला. त्यानंतर उसाला पाणी देण्यासाठी ते शेतात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सुपूत्र सौरभ शेट्टी होते.
दररोज लोकांच्या गराड्यात असलेल्या शेट्टी यांनी आपला सगळा वेळ कुटुंबातील लोक, गाई-गुरे आणि शेतशिवारात घालवला. शेतातील फुटलेली  पाईप जोडण्यापासून बारीक सारीक कामे केली.

शेट्टी स्वतः सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात मात्र आज त्यांनी काही मित्रांच्या पोस्टवर कमेंट केली. एरव्ही धावपळीच्या काळात त्यांना सोशल मीडियावर लक्ष देता येत नाही आज मात्र त्यांनी सोशल मीडियावरही वेळ घालवला.

शिवार ते संसद या पुस्तकात राजू शेट्टी यांनी शिवारातून संसदेत गेल्याची गोष्ट सांगितली आहे. आज शेट्टी पुन्हा एकदा शिवारात रमले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT