ex mp shivajirao adhalrao patil sheds 5 kg weight during lockdown walk
ex mp shivajirao adhalrao patil sheds 5 kg weight during lockdown walk 
राज्य

आढळराव-पाटलांनी `करून दाखविले'; दररोज पाच तास वॉकिंगने पाच किलो वजन घटविले

भरत पचंगे, शिक्रापूर

शिक्रापूर : कोरोनाच्या भितीने अनेक राजकीय नेत्यांनी स्वत:ला सक्तीने `होम-कोरंटाईन’ करुन घेतले असताना शिवसेना उपनेते व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या दीड महिन्यात मात्र दररोज पाच-पाच तास वॉकिंगची सवय लावून घेवून पाच किलो वजनघट करुन दाखविली आहे. खरे तर अशी दिनचर्या प्रत्येक राजकीय नेत्यासह सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी पथदर्शी असल्याने या त्यांच्या `लॉकडाऊन-वॉक’ची चर्चा सोशल मिडीयात सध्या जोरात आहे.
  
मुंबईत सकाळी वडीलांसोबत भाजी विक्री, दिवसभर एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम आणि रात्रीच्या वेळी रात्रशाळा असे करुन स्वत:चे उद्योग-विश्व उभारत शिरुरची खासदार हॅट्रीक करणारे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव आज कोरोनाच्या लॉकडाऊन गंभीर परिस्थितीत घरी गप्प बसलेले नाहीत. `आयुष्यात एकदाही दुपारी झोपलेलो नाही...’ असे आवर्जून सांगणारे आढळराव-पाटील यांनी आता या कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही एक कामगिरी करुन दाखविली आहे. त्यांनी या काळात कुठेच बाहेर जास्त फिरता येत नाही म्हणून मग पहाटे उठून वॉकींग सुरू केली आहे. सुरवातीला गंमतीगंमतीने सुरू केलेली ही मॉर्निंग वॉक त्यांनी एवढी वाढविली की, गेल्या दिड महिन्यात त्यांची दररोजची वॉकींग झालीय ती तब्बल पाच तास. अर्थात अगदी घड्याळ लावून आणि `फिटबीट’ अ‍ॅप्लिकेशन साथीला घेवून त्यांनी या वॉकींगच्या जोरावर आपले वजन कमी केलेय ते तब्बल पाच किलो.
       
गेल्या कित्येक वर्षात वजन कमी करण्याचे खुप प्रयत्न केले पण त्याला यश आले ते या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात असे म्हणून हा कोरोनाचा सुखद अनुभवही असल्याचेही ते मजेमजेने म्हणतात. अर्थात हे सर्व अनुभव ते सोशल मिडीयातूनही सातत्याने शेअर करीत असल्याने आपल्या सर्व फॉलोअर्सना ते लॉकडाऊनचा लाभ घ्या, स्वत:ला सशक्त आणि तंदुरुस्त बनवा असा सल्लाही देत राहतात. 

दरम्यान कोरोनाच्या काळात इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यातील कामातील फरक तुम्ही अनुभवाल. शिरुर लोकसभा मतदारसंघात अगदी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, जिल्हा प्रमुख माऊली कटके, माजी जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे ते माजी आमदार सुरेश गोरे, जेष्ठ नेत्या जयश्री पलांडे आदींसह सर्व सर्व स्तरांतील शिवसेना नेते, पदाधिकारी, शिवसैनिक सतत सामाजिक कामात व्यग्र आहेत. त्याचे कारण हेच आहे की, मला ही मंडळी गप्प बसू देत नाहीत आणि तेही माझ्यामुळे सतर्क राहतात. याचे संपूर्ण श्रेय तंद्रुस्तीला असल्याचेही ते आवर्जून सांगतात.  

कोरोनाग्रस्त भागांसह सर्व मोठ्या गावांत दौरे...!
गेल्या तीस वर्षांची डायबेटिक्सची आरोग्य-हिस्ट्री, कोरोनाचा संसर्ग होण्याची जादा शक्यता तरीही आढळराव यांनी शिरुर मतदार संघात वाघोली, शिरुर, हडपसर, घोडेगाव, मंचर, खेड, चाकण, जुन्नर, नारायणगाव, भोसरी, मोशी, शिरुर आदी भागात आपले दौरे चालू ठेवले आहेत. शिवसैनिक आणि संपूर्ण मतदार संघातील कार्यकर्ते आवर्जून बोलावतात व कोरोनाच्या गंभीर स्थितीतील ग्राऊंड रिपोर्टींग नेमके कळावे म्हणून हे दौरे आपण करीत असून कोरोना हद्दपार होईपर्यंत हे दौर थांबणार नाहीत असेही ते आवर्जून सांगतात. अर्थात हे सर्व दौरे केवळ फिजीकट फिटनेसमुळेच शक्य होत असल्याचेही ते आवर्जून सांगतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT