pro. Jogendra Kawade Press News Parbhani 
राज्य

साकीनाका अत्याचार प्रकरणातील आरोपीला भरचौकात फाशी द्या..

निर्भयाला एक न्याय व दलित महिलेला दुसरा न्याय हा भेदभाव का केला?

सरकारनामा ब्युरो

परभणीः साकीनाका प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे तसेच या प्रकरणातील आरोपीस भरचौकात फटके मारत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली. (Execute the accused in the Sakinaka atrocity case) पिपल्स रिपब्लिक पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक गुरुवारी (ता.१६) परभणीत पार पडली.

बैठकीनंतर कवाडे हे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,  साकीनाका प्रकरणातील पिडितेवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. (Pro, Jogendra Kawade,Maharashtra) दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पिडितेवर दिल्लीच्या सर्वोच्य एम्स या रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. दुर्देवाने तिचा तेथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

परंतू निर्भयाला एक न्याय व दलित महिलेला दुसरा न्याय हा भेदभाव का केला?  या घटनेतील पिडितेचे प्राण विचविणे आवश्यक होते, परंतू तसे झाले नाही. (Mahavikas Aghadi Government, Maharashtra)  राज्यात कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेस ध्ये महाविकास आघाडीच्या सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरु असतांना शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार सुरु झाला.

तेव्हा सर्वात आधी मी कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून सांगितले होते. भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत आघाडी करून सत्ता स्थापन करावी. पिपल्स रिपब्लिकन पक्ष हा महाविकास आघाडीचा मित्र पक्ष आहे.

परंतू असे असतांनाही या सरकारमधील कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसने आम्हाला राज्याच्या सत्तेतील आमचा वाटा अद्यापही दिलेला नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवू असेही कवाडे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT