Nana Patole
Nana Patole  
राज्य

रेमडेसिव्हरची निर्यातबंदी म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण…

Abhijeet Ghormare

भंडारा : केंद्र सरकारने रेंडेसिव्हर इंजेक्शनची निर्यात अखेर थांबवली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तशी घोषणा केली. आपल्या देशात रेमडेसिव्हरची पूर्तता होत नसताना शेजारच्या शत्रू राष्ट्राला इंजेक्शनचा पुरवठा करणे म्हणजे आपल्याच देशातील लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखे आहे आणि केंद्र सरकारने नेमके तेच केले. आता कोरोनाचे रुग्ण रेमडेसिव्हरशिवाय तडफडून मरत असताना रेमडेसिव्हरची निर्यातबंदी सरकारने केली. हे सरकारला उशिरा सुचलेले शहापण आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केला. 

जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आज येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. वाझे प्रकरणाची जी चौकशी सुरू आहे. त्याबद्दल विधानसभेतच आम्ही सांगितले होते. की या प्रकरणाचे दूध का दूध आणि पानी का पानी व्हायला पाहिजे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश आणि विद्यमान न्यायाधीशांची समितीही तयार केली होती. पण भाजपने न्यायालयात वेगळी भूमिका मांडली आणि या प्रकरणात सीबीआयला आणले गेले. सीबीआयचे काम आपण सुशांतसिंह राजपुतच्या प्रकरणात पाहिलेलेच आहे. अजूनपर्यंत त्या प्रकरणाचा अहवालच पुढे आलेले नाही. चौकशी योग्य प्रकारे झाली पाहिजे. विनाकारण कुणाला गोवण्याचा प्रयत्न होणार असेल तर ते चुकीचे होईल, असे नाना पटोले म्हणाले. 

नागपुरात पुन्हा सुरू होईल आरटीपीसीआर तपासण्या 
दक्षिण नागपुरात आरटीपीसीआर तपासणीच्या किट संपलेल्या आहेत. त्यामुळे तपासणी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. लवकरच किटची उपलब्धता होईल आणि तपासण्या सुरू होतील. लोकांच्या तपासण्या होणे गरजेचे आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या निर्धारित करून उपचार करणे सोयीचे होणार आहे. रुग्णांना शोधून ही साखळी तोडण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असल्याचे पटोले म्हणाले. 

लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. पण राज्यातील लोकांचा जीव वाचवणे आज गरजेचे आहे. त्यासाठीच सरकार लॉकडाऊन लावण्याच्या प्रयत्नात आहे. पण काही लोक यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. रेमडेसिव्हरचा तुटवडा एकट्या भंडारा जिल्ह्यातच नाही, तर सर्वत्र आहे. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाच्या सचिवांसोबत बोललो. आज सायंकाळपर्यंतच रेमडेसिव्हरचा पुरवठा भंडारा जिल्ह्याला केला जाईल आणि हा प्रश्‍न निकाली निघेल, असेही पटोले यावेळी म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT