Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Sarkarnama
राज्य

फडणवीस म्हणाले, ``आता सरकार आम्ही पाडणार नाही..``

Vishnu Sanap

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातील (BJP) नेते हे सातत्याने राज्यातील सरकार पडणार आणि भाजप सरकार स्थापन करेल, असे भाकीत करत असतांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र, याबाबतची आपली काहीशी भूमिका बदलली आहे. एका मुलाखती दरम्यान फडणवीसांनी आता हे सरकार आम्ही पाडणार नसून ते त्यांच्या अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला आहे.

फडणवीस म्हणाले, "भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारे फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे, असे वाटते तेव्हाच ते पडते. जेव्हा आता पडेल असे वाटते तेव्हा ते टिकते. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकारला रविवारी (ता.28 नोव्हेंबर) दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार टीकाटीप्पणी सुरू झाली आहे. फडणवीस यांना सरकार स्थापनेबाबत तुमच्या नेत्यांकडून सारखे बोलले जातेय याबाबत संजय राऊत यांनी सांगितले की आतापर्यंत 28 वेळा असे बोलले गेले आहे. यावर काय सांगाल? त्यावर बोलतांना ते म्हणाले की राऊतांना राज्यातील जनतेच्या महत्वाच्या व विकास कामाच्या विषयावरून लक्ष भरकटवणे हे त्यांचे काम आहे. त्यांनी राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर कधी प्रश्न विचारलेले बघीतले का? असा प्रतिसवाल त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांना सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारे फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असे वाटते तेव्हाच ते पडते. जेव्हा आता पडेल असे वाटते तेव्हा ते टिकते. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार अंतर्विरोधानेच पडेल, तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देवू" असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही विरोधी पक्षाच्या मोडमध्ये

राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत असून विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. राज्यात कुठलीही आपत्ती आल्यावर आम्ही तिथे जात आहोत. अतिवृष्टी झाली, पूर आला तरी आम्ही पोहोचतो, शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही गेलो. चिखलात जाऊन आम्ही त्याचे दुख: बघितले आहे. विरोधी पक्षाचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. म्हणूनच सत्तारुढ पक्षाला त्याचे चिमटे बसत आहेत. त्यामुळेच ते बोलत आहेत, असा टोलाही फडणवीसांनी सरकारला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT