narendra-modi--1-f.jpg
narendra-modi--1-f.jpg 
राज्य

देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या नफ्याचा प्रथमच मोठा निर्णय : मोदी

सतीश वैजापूरकर

शिर्डी : ज्या वेळी देशाला पोट भरण्यासाठीही अन्न नव्हते. त्या परिस्थितीत सरकारची प्राथमिकता होती, की शेती उत्पादन कसे वाढवावे. शेतकरी कोणते पिक घ्यावे, अधिक उत्पन्न कसे घ्यावे. शेतकऱ्यांनी घाम गाळून मेहनत घेतली. मोठे उत्पादन घेऊन देशाची भूक भागविली. परंतु त्यावेळी शेतकऱ्यांच्या नफ्यासाठी सरकारचे लक्ष गेले नाही. परंतु प्रथमच या विचाराला बदलले आहे. देशाच्या शेतकऱ्यांसाठी प्रथमच विविध निर्णय घेतले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

विखे पाटील यांच्या आत्मचरित्र असलेल्या `देह वेचावा कारणी` या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हर्च्यूअल व्हिडिओ काॅन्फरन्सीने उपस्थित होते. लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्तविक केले.

शेतीविषयक कायद्याबाबत मोदी म्हणाले, की शेतीविमा, खतांमधील अडचणी दूर करण्याचा प्रय़त्न केला आहे. पंतप्रधान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अल्प खर्चासाठी दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाही. या योजनेतून 1 लाख करोड रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केले आहे. कोल्ड चेंज मेगा फूड पार्कही तयार झाले आहे. गावातील बाजारापासून ते शहरातील मोठ्या मंडईपर्यंत लाभ होणार आहे. बाळासाहेब विखे पाटील म्हणत होते, शेती निसर्गाधारित केली पाहिजे. हे ज्ञान सांभाळून ठेवले पाहिजे. नवीन-जुन्याचा मेळ घातला पाहिजे. जुन्या ज्ञानाला संरक्षित ठेवून त्यात नव्याने भर घातली पाहिजे. जुन्या-नव्यांचा मेळ घालून विकास साध्य होईल. ऊसाची शेती नगर जिल्ह्यात महत्त्वाची आहे. त्यासोबत इथेनाॅलही काढले जाते. महाराष्ट्रात अनेक उद्योग असे सुरू आहेत. जस-जसे पेट्रोलमध्ये इथेनाॅलचा वापर वाढेल, तसा शेतकऱ्यांच्या खिशात पैसा वाढेल. डाॅ. बाळासाहेब विखे पाटील महाराष्ट्रातील गावांमध्ये समाधान राहण्यासाठी कायम प्रयत्न करीत होते, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

Edited - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT