mp omrajenibalkar demand to pm modi news 
राज्य

मनमोहनसिंग सरकार प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; राजेनिंबाळकरांचा मोदींना मेल

शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करणे शक्य होणार नाही, याचा विचार करुन सरकारकडुन काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे मनमोहनसिंग सरकारने संपूर्ण कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला होता. त्याचप्रमाणे यावर्षीही संपूर्ण कर्जमाफी योजना राबविणे आवश्यक आहे.

तानाजी जाधवर

उस्मानाबादः केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज माफ करावे अशी मागणी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे केली मेलद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे मध्यम कर्ज आणि दोन लाखाहून अधिक पिक कर्ज घेणारे शेतकरी खूपच कमी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग, फुलशेती, द्राक्षे व आंबे आदी पिके आहेत किंवा घेतली जातात, अशा शेतकऱ्यांचे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज माफ केले जात नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्राकडुन झाला पाहिजे अशी, आग्रही मागणी खासदार राजेनिंबाळकर यानी पंतप्रधानाकडे केली आहे.

राज्याला अलिकडील काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडला असुन दुष्काळाच्या दुखातुन सावरलेल्या शेतकऱ्यांना आता कोरोनाच्या संकटाने ग्रासल्याचे दिसुन येत आहे. अशावेळी त्याला आधार देणे महत्वाचे आहे, आपला देश कृषीप्रधान म्हणुन ओळखला जात असला तरी त्या बळीराजाची अवस्थाच दयनीय झाली आहे. आता केंद्रातील सरकारने बळीराजाला संकटातून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे, असेही राजेनिंबाळकर यांनी आपल्या मेलमध्ये नमूद केले आहे.

https://www.facebook.com/MySarkarnama/posts/1298952913647656

राज्यात कोरोना विषाणुचा परिणाम महाभयंकर स्वरुप घेताना दिसत आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला काहीच किंमत मिळत नसल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करणे शक्य होणार नाही, याचा विचार करुन सरकारकडुन काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे मनमोहनसिंग सरकारने संपूर्ण कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला होता. त्याचप्रमाणे यावर्षीही संपूर्ण कर्जमाफी योजना राबविणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज माफ करावे, अशी विनंती देखील या मेलमध्ये करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT