vaibhav-pichad-28final.jpg
vaibhav-pichad-28final.jpg 
राज्य

माजी आमदार पिचड यांनी केले देवीचे मंदिर साफ

शांताराम काळे

अकोले : आपल्या लहानपणापासूनच मातोश्री हेमलता पिचड यांच्या संस्कारमुळे रंधा फॉल येथील घोरपडा देवीवर श्रद्धा त्यामुळे उद्या घटस्थापना असून, माजी आमदार वैभव पिचड यांनी देवीच्या मंदिरात जाऊन मंदिराचा गाभारा व हॉल स्वतः सानि टयझर करून प्रेशर पाईप लावून धुतले, ते पाहून कार्यकर्ते अवाक झाले.

लीडर होऊन आपण आपले काम करावे, असा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला आहे. दरवर्षी नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी देवीच्या मंदिरात जाऊन पिचड कुटुंबीय घोरपडा देवी मंदिरात जाऊन साफसफाई व घटस्थापनेच्या पूर्व तयारी करतात. आज सकाळी त्यांनी काही ठराविक कार्यकर्त्यांसह मंदिरात जाऊन मंदिर स्वच्छ केले.

मंदिरातील नियोजन करून परिसरातील कचरा व मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक भाविकाला सॅनिटायझरचा वापर करूनच मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन केले. त्यामुळे कार्यकर्ते यांनी भाऊ तुम्ही सुद्धा सफाई करता आमच्याकडे द्या, आम्ही करतो, परंतु नाही, मीच हे काम करणार, असे म्हणत त्यांनी दोन तासात मंदिर स्वच्छ करून टाकले.

महाराष्ट्रातील विविध देवीमंदिरांत घटस्थापनेचे नियोजन होत असून, नगर जिल्ह्यातही देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी झाली आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT