radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg 
राज्य

गाैतम हिरण हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश ः आमदार विखे पाटील

सरकारनामा ब्युरो

मुंबई : श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या घटनेबाबत गृहमंत्र्यानी तातडीने निवेदन करावे, आशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिरन यांच्या हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश असून, गुंडावर नाही तर, सामान्य माणसांवरच पोलीसांची दहशत अधिक दिसत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद विधासभेत उमटले. विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरेन यांची हत्या म्हणजे  गृहविभागाचे नियंत्रण राहीले नसल्याचा थेट आरोप केला.

गृहखात्याचे कोणतेही नियंत्रण आता गुंडावर तर फक्त  सामान्य माणसांवर आहे. मुबईत आपले प्रश्न घेवून येणाऱ्यांना पोलीस धाक दाखवितात. मूठभर लोकांमुळे गृहखाते बदनाम होत असल्याकडे लक्ष वेधून आमदार विखे पाटील म्हणाले, की हिरन यांचे अपरहण झाल्यानंतर पोलीस प्रशासनास व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सर्व माहिती दिली होती. परंतू याबाबत गांभीर्य न दाखविल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या राज्यात आता आमदारांनाही फेसबुकवरून धमक्या येवू लागल्या असतील, तर गृहविभागाची सायबर शाखा काय करते, असा प्रश्नही आमदार विखे पाटील यांनी उपस्थित केला.

गौतम हिरण यांचे वडील  स्वातंत्र्य सेनानी होते. आशा कुटूंबितील व्यक्तीची हत्येची घटना निषेधार्ह असून, याची तातडीने चौकशी करावी, आशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

दरम्यान, तालुक्‍यातील बेलापूर येथील अपहरण झालेले व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा मृतदेह काल सकाळी वाकडी रस्त्यावरील रेल्वेमार्गासमोरील यशवंतबाबा चौकी परिसरात आढळला. बेलापूर बाह्यवळण परिसरातून एक मार्च रोजी त्यांचे अपहरण झाले होते. पोलिस तपास सुरू असताना, काल सातव्या दिवशी कुजलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह सापडला. 

बेलापूर बाह्यवळणासमोरून एक मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिरण यांचे अपहरण झाले होते. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, बेलापूर खुर्द व बुद्रुक येथे शनिवारी "बंद' पाळण्यात आला. बेलापूर ग्रामस्थांनी बैठक घेत, हिरण यांची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. या घटनेचे पडसात थेट विधानसभेच्या अधिवेशनात पडले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT