give special reservation to wards of doctors nurses treating corona patients says narendra kale 
राज्य

`त्यांना' वैद्यकीय प्रवेशात विशेष आरक्षण द्या : डॉ. नरेंद्र काळे

डॉ. नरेंद्र काळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने ६५ हजार फेस शिल्ड वाटपाचीही माहिती दिली.

सरकारनामा ब्युरो

बीड : कोरोना विषाणूने जगाला हादरुन टाकले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सच्या पाल्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी विशेष आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र स्टेट डेंटल काऊंसीलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केली.

डॉ. काळे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठविले आहे.

जगात कोरोनाने हाहाकार घातला असला तरी राज्यात कोरोना योद्धे या विषाणूशी धीराने लढत आहेत. महाराष्ट्रात अनेक डॉक्टर व नर्स आपला जिव धोक्यात घालून कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु, दुर्दैवाने काही डॉक्टर व नर्सला या विषाणूची बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पाल्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेशात विशेष आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे. एन ९५ मास्क व पीपीई किटच्या किंमती नियंत्रित ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, शनिवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने राज्यभर ६५ हजार फेस शिल्डचे वितरण सुरू असल्याच्या उपक्रमाची माहिती दिली. कोविड पेशंटची तपासणी केलेल्या व उपचार केलेल्या रुग्णालयांना विनाकारण सिल करु नये, अशी मागणीही त्यांनी केली. तपासणी केलेल्या डॉक्टरांचा अहवाल निगेटीव्ह असलेल्या डॉक्टरांना हॉस्पिटल क्वारंटाईन करू नये, खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन राजेश टोपे यांनी दिल्याचे डॉ. नरेंद्र काळे म्हणाले.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT