Prithviraj chavan
Prithviraj chavan 
राज्य

तर सहा महिन्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष झालो असतो : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करा, असा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना दिला आहे, अशी माहिती मला समजली आहे. मात्र, पक्षातून अद्यापही कोणीही मला काहीही विचारलेले नाही, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

विधानसभा अध्यक्ष व्हायचेच असते तर सहा महिन्यापूर्वीही होता आले असते, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

वास्तविक दोन महिन्यांत श्री. चव्हाण यांनी खळबळ उडवणारे काँग्रेसमधील एकमेव नेतृत्व म्हणून ओळखही निर्माण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा आहे. दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात किचन कॅबिनेटमध्येही श्री. चव्हाण यांचा समावेश आहे. अशी स्थिती असतानाच अचानक त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.

अध्यक्षपदाची चर्चा चालू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु पृथ्वीराज बाबांनी त्यांची भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यांची भुमिका नेहमी प्रमाणे गुलदस्त्यातच आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत आहेत. त्यांनी तेथे पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आहेत.  त्यामुळे पटोले यांची कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे.

त्याबाबत श्री. चव्हाण म्हणाले, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत लॉबींग केले आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी माझे नाव दिले आहे. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण आणि कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना दिला आहे, असे समजते. मात्र त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही काहीही विचारणा झालेली नाही.

त्यामुळे सध्या तरी त्यावर काही मत व्यक्त करणार नाही. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षपदाचा त्या पदावर जायचं असते तर सहा महिन्यापू्र्वीच ते पद घेता आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रश्रेष्ठींकडे दिल्लीत जावून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काही चर्चा केली आहे. त्यामध्ये समजलेल्या माहितीनुसार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आहे. मात्र अद्यापही त्या चर्चेची खात्री झालेली नाही किंवा पक्षातील कोणीही ज्येष्ठांनी मला काहाही विचारलेले नाही, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT