Kannad Taluka Heavy Rain News Aurangabad
Kannad Taluka Heavy Rain News Aurangabad 
राज्य

तलाव फुटले, दरड कोसळली, शेती, जनावरे वाहून गेले;अतिवृष्टीमुळे हाहाकार..

सरकारनामा ब्युरो

कन्नड ः  तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. कन्नड-चाळीसगांव घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली, दोन पाझर तलाव फुटले, अनेकांची शेती, जनावरे दुकाने वाहून गेली. घाटातील वाहतूक बंद पडल्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या. (Heavy rains in Kannada taluka, landslides in Ghats; The government took a review.) या नैसर्गीक संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळा आवश्यक ती मदत पोहचवा, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील नागद परिसरात दोन पाझर तलाव फुटले असून त्यामुळे नागद गावात हाहाकार उडाला. ( Aurangabad District, Kannad Taluka) नागद गावालगत नदीकाठी राहत असलेल्या कुटुंबांना ग्रामस्थांनी पहाटे तीन वाजता चक्क स्लॅब फोडून बाहेर काढले.

नागद गावाजवळ गडदगड धरण असून मागच्या आठवड्यातच ते पूर्ण भरले  होते. तसेच गौताळा अभयारण्याकडे भिलदरी तांडा परिसरात दोन पाझर तलाव पहाटे एक वाजेच्या दरम्यान फुटले. ( State Goverment Review)  त्याचे पाणी पूर्ण भरलेल्या गडदगड प्रकल्पात आले. त्यामुळे नागद गावाजवळून जाणाऱ्या नदीला महापूर आला. नदीकाठी राहणारे उमेश पाठक यांच्या घरात पाणी शिरल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या घरावरील स्लॅब फोडून  त्यांच्यासह पत्नी व दोन मुलींना बाहेर काढले.

नागद गावात पाणी घुसून अनेक घरांचे नुकसान झाले असून टपऱ्या, जनावरे, केळीच्या बागा वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.  भिलदरी येथील पाझर तलाव फुटल्यानंतर नदी मार्गात असलेले सायगव्हान येथील स्मशान भूमीचे शेड वाहून गेले. कन्नड नागद मार्गावरील सायगव्हान ते गौताळा दरम्यानच्या पुलाचे कठडे वाहून गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर नदीतील मती,दगड गोटे यांचा खच साचला असल्याने वाहतूक बंद झाली आहे.

या शिवाय कन्नड-चाळीसगांव घाटात तीन ठिकाणी दरड कोसळ्यामुळे काल रात्रीपासून हा मार्ग बंद होता. आज दिवसभरापासून वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झटत होती. दरड कोसळ्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकाकडून देखील याचा आढावा घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी एका बैठकीत परिस्थीचा आढावा घेऊन या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT