मुंबई : राज्यात बेरोजगाराचे विदारक वास्तव असताना आहे, निवृत्तीचे वय वय वाढविल्यास सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यासाठी नेमलेली समिती तातडीने रद्द करावी आणि निवृत्तीचे वय 55 करावे अशी मागणी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेरोजगारी आणि त्यासंदर्भातील आकडेवारी देत सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्नही कुळकर्णी यांनी केला आहे. सरकारने जे अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले त्यात राज्याच्या बेकारीची विदारक स्थिती मांडली असल्याचा दाखलाही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.संख्या सेवायोजन कार्यालयात नोंदवलेल्या बेकारांच्या संख्येत 18 टक्के पदवीधर, 7 टक्के पदविकाधारक, 3 टक्के पदव्युत्तर पदवीधारक असे 27 टक्के सुशिक्षित बेकार आहेत. तर महाराष्ट्रात 5 हमालांच्या जागेसाठी जे हजारो अर्ज आले त्यात 5 एम फील आणि 984 पदवीधर यांनी अर्ज केले होते ही वस्तुस्थितीही त्यांनी सरकारच्या नजरेस आणून दिली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार देशातील 20 टक्के तरुण बेरोजगार आहेत. भारतात 3 पदवीधरांपैकी 1 पदवीधर आज बेकार आहे. लेबर ब्युरो च्या मते महाराष्ट्रात 100 पैकी 28 तरुण बेकार आहेत. गेल्या वर्षात कित्येक लाख डीएड आणि बीएड यांना नोकरी मिळू शकल्या नाहीत. इतकी भीषण नोकरी मिळण्याची स्थिती असताना दुसरीकडे राज्यात नोकर भरती बंद आहे. आर्थिक सर्वेक्षणात म्हटल्याप्रमाणे एकूण नोकऱ्यांपैकी 22.5 टक्के पदे रिक्त आहेत म्हणजे 1 लाख 77 हजार पदे सरळ रिक्त आहेत. राज्यात इतकी बेकारी असताना ही पदे भरायला हवीत आणि त्याचवेळी निवृत्तीचे वय 50 किंवा 55 करायला हवे. खरे तर इतकी प्रचंड बेकारी असताना एका व्यक्तिला जास्तीत जास्त 25 वर्षे नोकरी द्यायला हवी त्यामुळे सुशिक्षित बेकारांना संधी मिळेल अशी एक सूचनाही कुलकर्णी यांनी निवेदनात केली आहे.
काही कर्मचारी संघटना, सनदी अधिकारीही सरकारला वेळोवेळी वेठीस धरून आपले वय आणि सवलती लाटून घेत असतात, त्याच धर्तीवर निवृत्तीचे वय वाढविण्यासाठी सरकारवर दडपण आणून निवृत्त सनदी अधिकारी बी.सी.खटूआ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली यात आणखी 4 सदस्य हे आणखी सनदी अधिकारीच आहेत.त्यामुळे निर्णय घेणारे सर्व सनदी अधिकारी असल्याने 58 चे वय 60 करा ही शिफारस केली जाईल. त्यामुळे ही समिती त्वरित बरखास्त करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्रयांकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.