Pravin darekar.jpg
Pravin darekar.jpg 
राज्य

मी एसटी कंडक्टरचा मुलगा, म्हणून मला प्रश्नांची जाण : प्रवीण दरेकर

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः राज्य परिवहन महामंडळासाठी (एसटी) विशेष पॅकेज हवे आहे. एसटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटावा. नवीन गाड्यांच्या माध्यमातून या मंडळाला उर्जितावस्था आणावी, अशी मागणी करून, मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. त्यामुळे मला त्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सांगितले.

विधानपरिषदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरेकर भाषण करीत होते. ते म्हणाले, की एसटी कर्मचाऱ्याच्या पगाराबाबतही आग्रही भूमिका घेतली होती. ते कर्मचारी राबत असताना त्यांचा तीन-तीन महिने पगार मिळत नाही, हे उचित नाही. मी एसटी कंडक्टरचा मुलगा असल्याने मला या विषयाची जाण आहे. एसटीचा आर्थिक स्तर कसा उंजावेल, याचा प्रयत्न करायलार हवा. नुसतीच भागवाभागवी केली, तर एसटीला एक दिवस टाळे लावावे लागेल. एसटीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करावी लागणार आहे. त्याकडे जास्त प्रमाणावर लक्ष दिले पाहिजे. परिवहनमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत लक्ष घालावे. एसटी महामंडळ हे तोट्यात जात आहे. त्याचा कधी विचार करणार की नाही. एसटी आर्थिदृष्ट्या ससक्ती कसी होईल, हे पाहिले पाहिजे. एसटीचीही काॅलिटी बदलायला पाहिजे. चांगल्या प्रकारच्या गाड्या आल्या पाहिजेत. एकीकडे प्रगतीकडे जात असताना एसटी मागे कशी, असा सवाल त्यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाहीत. तीन महिने वाट पहावी लागते. प्रगार वेळेत मिळण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याची गरज आहे. एसटी कामगारांना, वाहक, चालक यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. बसस्थानकांचे नुतनीकरण करावे. मंडळासाठी नवीन एसटी बस मागवाव्यात. बसमध्ये आवश्यक त्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी दरेकर यांनी केली.

कोरोनाच्या बाबतीत नियोजनाचा अभाव

पैसे उभारण्याची क्षमता इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. आपली प्राॅपर्टी जास्त आहे. सरकारच्या जागा केवळ बळकावण्यासाठीच असतात. तुमच्या म्हाडाच्या जागा कुठल्या आहेत. कलेक्टरच्या जागा, पर्यटनच्या जागा याची एक यादी करायला हवी. त्यात मोकळ्या जागा कुठल्या आहेत, याचे आॅडिट करा. काही हजार कोटी त्यातून मिळतील. कलेक्टर, महसूलला मॅनेज करून सरकारी जागा एखाद्याच्या घशात घालतो, हे कसे काय होऊ शकते. शासनाच्या जागांची यादी तयार करायला हवी, असे दरेकर म्हणाले.
 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT