Mla Vinayk mete- Chatrapati Sambhajiraje News Aurangabad
Mla Vinayk mete- Chatrapati Sambhajiraje News Aurangabad 
राज्य

संभाजीराजेंनी केलेल्या मागण्याच मी राज्य सरकारकडे केल्या होत्या ः मेटेंचा दावा

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः मराठा आरक्षणा संदर्भात छत्रपती संभाजीराजेंनी जी भूमिका आज जाहीर केली, तीच भूमिका आणि मागण्या राज्य सरकारकडे मी आधीच केल्या होत्या, असा दावा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.(I had made the same demands made by Sambhaji Raje to the state government: Mete's claim)

भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नुकताच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाऊन मराठा आरक्षण समन्वयकांशी चर्चा केली होती. Sambhaji Raje had recently visited some districts of Maharashtra and had discussions with the Maratha Reservation Coordinators.) त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आज आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यानंतर विनायक मेटे यांनी संभाजीराजे यांना टोला लगावत आंदोलनाची घोषणा मी आधीच केली होती, तेव्हा कोरोनाचे कारण पुढे केले गेले, मग आता कोरोना नाहीसा झाला का? असे म्हणत मेटे यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली.

छत्रपती संभाजी राजे यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपण राज्य सरकारला मराठा आरक्षणा संदर्भात तीन पर्याय सुचवल्याचे सांगितले. येत्या ६ जूनपर्यंत यावर काही ठोस निर्णय झाला नाही, तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन करायला देखील मागेपुढे पाहणार नाही, असा अल्टीमेटम देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांना दिला.

त्यानंतर मराठा आरक्षणासाठी ५ जून रोजी संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा करणारे व ईडब्लूएस आरक्षणाअंतर्गत सवलती मिळाव्यात यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका करणारे आमदार विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (How Corona was carried forward when we announced the movement. Is Corona going to end on June 7?) मेटे म्हणाले, जर कोणी आता आंदोलनाची तयारी दाखवत असेल तर आम्ही आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी कोरोना पुढे कसा केला गेला. आता ७ जूनला कोरोना संपणार आहे का?

आंदोलन झाली पाहिजेत..

मराठा आरक्षण हे समाजातील मागर्सवर्गीयांसाठी मागत आहोत श्रीमंतांसाठी नाही. मी सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत, त्याच आज संभाजीराजे यांनी केल्या आहेत, असा दावा करत दोन प्रवाह तयार झाले तरीही मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन झाली पाहिजेत, असेही मेटे म्हणाले.

विशेष म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यात त्यांना ठिकठिकाणी विनायक मेटे यांनी केलेल्या मोर्चाच्या घोषणे संदर्भात प्रश्न विचारले गेले. यावर मेटे मेटे आहेत, मी छत्रपती संभाजी, माझी आणि त्यांची तूलना करू नका, असे म्हणत त्यांनी मेटेंची खिल्ली उडवली होती.  त्यानंतर आता मेटे यांनी संभाजीराजेवर टीका करण्याची संधी हेरली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT