i support nivrutti maharaj says suresh dhas
i support nivrutti maharaj says suresh dhas 
राज्य

मी निवृत्ती महाराजांच्या पाठीशी खंबीर : सुरेश धस

सरकारनामा ब्युरो

कडा (जि. बीड) : ‘महाराज जे बोलले ते गुरु चरित्रात आहे. मग त्यात गैर काय असा प्रश्न उपस्थित करत आपण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

‘कोणीतरी काही बोललं म्हणून राज्य सरकार निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर राज्य सरकारच्या अकलेची कीव करावी वाटते. जर इंदुरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू”, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी निवृत्ती महाराज यांचे समर्थन केलं. 

‘महाराज जे बोलले ते गुरु चरित्रात आहे. मग त्यात गैर काय असा सवाल धस यांनी केला. ‘पीसीपीएनडीटी कायदा आणि इंदुरीकर महाराज बोलले याचा काय संबंध आहे?’

राज्य सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली, याची मला कीव करावीशी वाटते, असं धस म्हणाले. वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन जे कीर्तन करतात, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच कीर्तन ऐकलं जातं, असंही धस म्हणाले.

‘महाराज जे बोलले ते गुरु चरित्र्यामधील आणि पुराणातील सप्रमाण दाखले आहेत. उठ सूट एका धर्माच्या पाठीमागे लागणं योग्य नाही. आधी शनी मंदिर, नंतर इंदुरीकर महाराज यांच्या पाठीमागे लागले आहेत. कोणी काही बोललं म्हणून राज्य सरकारने महाराजांना नोटीस पाठवत असेल, तर राज्य सरकारच्या अकलेची कीव येते.

नोटीसीपेक्षा पुढची कारवाई केली तर अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल असेही धस म्हणाले. जर कारवाई केली, तर आम्ही शंभर टक्के इंदुरीकर महाराजांच्या पाठीमागे राहू. निश्चितपणे आम्ही त्यांची बाजू घेऊ असं ही धस यांनी सांगितलं.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT