Tanpure and vikhe.jpg
Tanpure and vikhe.jpg 
राज्य

मी मंत्री असतो, तर राजीनामा दिला असता ! खासदार विखेंचा मंत्री तनपुरेंना टोला

मुरलीधर कराळे

नगर ः तालुक्यातील मंत्री असताना त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता येत नाही. विजेच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, हे दुर्दव्य आहे. हा प्रश्न सोडविता येत नसेल, तर त्यांनी खुर्चीला चिकटून न बसता राजीनामा द्यावा. मी मंत्री असतो, तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा दिला असता, अशी टीका भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली.

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळावर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल राहुरीतील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार आज राहुरीत झाला. या वेळी खासदार विखे पाटील उपस्थित होते.

खासदार विखे पाटील म्हणाले, की विजेच्या प्रश्नांबाबत गंभीर तक्रारी येत आहेत. शेतककऱ्यांचे पीक जोमात आले असताना त्यांच्यासमोर रोहत्रे उतरवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रकार आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसणार नाही. तालुक्यातील इतर निवडणुकाही पूर्ण ताकतीने लढू. ज्यांना वाड्यावर जायचे, त्यांनी खुशाल जावे. आपला नातेवाईक असो, की आपला कार्यकर्ता असो, आगामी काळात दिरंगाई चालणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी आता कार्यकर्त्यांनी लढायचे आहे. राहुरी तालुक्यातील प्रश्नांसाठी आता कर्डिले यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

पुढील निवडणूकही लढणार

तालुक्यातील प्रश्नांसाठी पुढील विधानसभा निवडणूक आपण पुन्हा लढणार आहोत. बंद पडलेला डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीत करण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू, ,असे आश्वासन शिवाजी कर्डिले यांनी दिले.

हेही वाचा...

चोरांसह रोडरोमिओंचा बंदोबस्त करा

नगर : शहरात गेल्या महिन्याभरात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेविका पुष्पा बोरुडे यांनी केली आहे. 

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक श्‍याम नळकांडे आदी उपस्थित होते.  निवेदनात म्हटले आहे की, बालिकाश्रम रस्ता, धर्माधिकारी मळा व कल्याण रस्ता परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा. तसेच बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी शिकवणी वर्ग व महाविद्यालयही आहे. या भागात रोडरोमिओंचा त्रास वाढला असून, त्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT