shinde-phalke
shinde-phalke 
राज्य

राजेंद्र फाळकेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास भाजपचे प्रा. शिंदे स्वागत करणार

सरकारनामा ब्युरो

कर्जत : आगामी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिल्यास त्याचे स्वागत करू, या माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

कर्जतमध्ये `कुकडी`चे आवर्तन त्वरित सोडण्यात यावे, या मागणीसाठी माजीमंत्री प्रा.शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह काल उपोषणास बसले होते. त्या वेळी त्यांनी हे वक्तव्य करून धमाल उडवून दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, फाळके यांनी त्यांच्या पक्षासाठी माझ्याविरुद्ध दोन वेळेला उमेदवारी केली. तसेच विद्यमान आमदार भेटत नाहीत, अशी मतदार संघातील अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजेंद्र फाळके यांना संधी दिल्यास स्थानिक असल्याने ते सहज सर्वांना उपलब्ध होतील. या मुळे कर्जत जामखेडमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.
 

हेही वाचा...

प्राजक्त तनपुरे यांच्याकडून कोरोना योद्‌ध्यांचे कौतुक 

पारनेर : तालुक्‍यातील महसूल, आरोग्य, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले नाहीत. पुण्या-मुंबईतून तालुक्‍यात येणाऱ्यांची संख्या मोठी असताना, तालुक्‍याचा कोरोनापासून बचाव केल्याबद्दल नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिकारी, आमदार नीलेश लंके यांचे अभिनंदन केले. 

तनपुरे यांनी सोमवारी तालुक्‍याची आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार नीलेश लंके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तनपुरे यांनी कोरोनाची सद्यःस्थिती, तालुक्‍यातील रुग्णसंख्या, तसेच क्वारंटाईन व्यक्ती व त्यांच्या सुविधांविषयी माहिती घेतली. कोरोनाबाबत अधिकाअधिक जागरूक राहण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. 

तालुक्‍यातील पाणीटंचाईचीही माहिती त्यांनी घेतली. किती टॅंकर सुरू आहेत व भविष्यात काय स्थिती असेल, याचा आढावा घेतला, तसेच तालुक्‍यातील विजेची स्थिती व पावसाळ्यापूर्वी कोणती कामे करणे गरजेचे आहे, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तनपुरे यांनी आमदार लंके यांच्या कार्याचे कौतुक केले. लंके यांनी तालुक्‍यात गेले दोन महिने गरजूंना केलेल्या मदतीची, तसेच अन्नदान व मजुरांची पाठवणी याबाबतची माहिती दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT