औरंगाबाद ः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा पाहून भारावले. केंद्र सरकारच्या शहरी विकास समितीचे पथक सध्या आंध्र ्प्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर आहे. इम्तियाज जलील हे देखील या समितीचे सदस्य असल्याने ते देखील या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. नुकतीच त्यांनी बालाजी मंदिराला भेट देऊन तेथे दररोज येणाऱ्या लाखो भाविकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा पाहून चांगलेच भारावले. `आय लव तिरुपती`, च्या डिजीटल फलका समोर उभे राहत त्यांनी फोटोही काढले.
औरंगाबादेत सध्या लव औरंगाबाद, लव खडकी, लव प्रतिष्ठाण, नमस्ते संभाजीनगर व सुपर संभाजीगरच्या फलकावरून चांगलाच वाद पेटला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे,अशी मागणी या निमित्ताने शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांनी केली आहे. लव औरंगाबादचे फलक फोडण्यात आल्याने शहरातील वातावरण खराब होते की काय अशी भिती देखील व्यक्त केली गेली. एमआयएमने यावर फारशी तिखट प्रतिक्रिया न देता संयमित भूमिका घेतली होती.
अशातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच चर्चिला जातोय. इम्तियाज यांनी स्वतःच हा फोटो त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केला आहे. हा फोटो आहे तिरुमला तिरूपती बालाजी मंदिर परिसरातला. या ठिकाणी लावण्यात आलेल्या लव तिरुपती या डिजीटल फलका समोर उभं राहत इम्तियाज यांनी प्रसन्न भावमुद्रेत फोटो काढला आहे. अर्थाल लव औरंगाबाद आणि या फोटोचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण हा फोटो पोस्ट करतांना त्यांनी तिरुपती बालाजी मंदिर परिसरात भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविंधांचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.
केंद्र सरकारची अर्बण डेव्हलप्मेंट कमिटी सध्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहे. यामध्ये इम्तियाज जलील यांचा देखील सहभाग आहे. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला ते हजर राहू शकले नाही. तिरुपती बालाजी मंदिर परिसर व तेथील सोयी-सुविधांची पाहणी केल्यानंर इम्तियाज जलील यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. तिरुपती संस्थान कडून येथे दररोज दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अत्यंत चांगल्या सुविधा पुरवल्या जातात, हे पाहून मला खूप समाधान वाटले, असे त्यांनी म्हटले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.