Bjp Leader Pankaja-Pritam munde Political News Beed 
राज्य

भागवत कराडांच्या मंत्रीमंडळ समावेशाने, पंकजा-प्रितम मुंडे समर्थकांना धक्का..

भलेही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी ओबीसी व मास लिडर ही त्यांची ओळख कायम आहे.

Datta Deshmukh

बीड : दोन वेळा विक्रमी मतांनी विजय, उच्चशिक्षीत आणि सहा अनुभवासोबतच दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा होती. (With the inclusion of Bhagwat Karad's cabinet, Pankaja-Pritam Munde supporters were shocked.)  पण, ज्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे डॉ. भागवत कराड यांना महापौरपदाची संधी मिळाली त्यांनाच आता मुंडेंऐवजी केंद्रात संधी मिळाली.

यापूर्वीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या अपरोक्ष त्यांना राज्यसभेची संधी दिली गेली. तर, विधान परिषदेच्या जागांसाठीही पंकजा मुंडे यांचा विचार न करता लातूरच्या रमेश कराड यांना संधी दिली गेली. (Bjp Leader Pankaja Munde)  त्यामुळे भाजपची मुंडेंबाबतची भूमिका चक्रावणारी असल्याचे बोलले जाते.

गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपला बहुजन चेहरा मिळवून दिला. विशेष म्हणजे तत्कालिन युतीमध्येही औरंगाबाद शहरात शिवसेनेची चालती असायची. शहरातील तीनही मतदारसंघ शिवसेनेकडे असायचे. (Bjp Mp Dr. Pritam Munde) महापालिका निवडणुकीत भाजप लहान भाऊच असायचा. पण, वाटाघाटीत दिवंगत मुंडे अडीच वर्ष का होईना भाजपच्या पदरात महापौरपद पाडून घेत असतं.

त्यातूनच डॉ. कराड यांच्या गळ्यात दोनदा महापौर पदाची माळ पडली होती.  पण, आता ज्यांच्यामुळे कराड महापौर झाले, त्याच मुंडेंच्या वारसांना डावलून कराडांना केंद्रात मंत्री केले? यांचे मुंडे यांच्या समर्थकांना कोडे पडले आहे. केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणूनच नाही, तर डॉ. प्रितम मुंडे यांनी आपला राजकीय वकुब देखील सिद्ध केला आहे.  

पुन्हा धक्कातंत्र..

दोनवेळा खासदार आणि विशेष म्हणजे मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी विजय मिळविलेला आहे, शिवाय त्या उच्चशिक्षीतही आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळात समावेश करण्यासाठी ओबीसी व उच्चशिक्षित चेहरा या निकषात डाॅ.प्रिमत मुंडे बसत असतांना देखील त्यांना डावलण्यात आले.  परंतु, तिसऱ्यांदा मुंडेंबाबत भाजपने असे धक्कातंत्र वापरले आहे. डॉ. कराड यांची राज्यसभेवर निवड झाली तेव्हाही पंकजा मुंडेंना विश्वासात न घेता त्यांचे नाव अंतिम करण्यात आले होते.

तर, पुन्हा विधान परिषदेच्या वेळी देखील हाच अनुभव आला. एकीकडे त्या स्वत: विधानपरिषद निवडणुकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना त्यांचेच समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.  पंकजा मुंडे बद्दल आपल्या मनात कुठल्याच प्रकारचा राग नाही हे दाखवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली.  तेव्हा झाले गेले विसरून त्या पुन्हा ताकदीने संघटन कामाला लागल्या होत्या. असे असतांना पुन्हा मुंडे भगिनींना डावलण्याचा प्रकार घडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भलेही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी ओबीसी व मास लिडर ही त्यांची ओळख  कायम आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत त्यांनी हे दाखवून दिले होते. मात्र असे असले तरी मोदी, शहा जोडीची मुंडे भगिनींवरची नाराजी अजूनही कायम आहे, हेच कराडांच्या मंत्रीमंडळ समावेशावरून सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT