Sunil Kedar 
राज्य

शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांचा विषय राजकारणातून संपला : सुनील केदार

दिल्लीत शेतकऱ्यांना अडवण्यात आले, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यांची विचारधारा दाबण्यात आली. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा नायनाट होणार आहे.

सुरेंद्र रामटेके

वर्धा : भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्यांना देशवासीयांनी धडा शिकवलेला आहे. आत्ता परवा परवा दिल्लीत शेतकऱ्यांना अडवण्यात आले, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यांची विचारधारा दाबण्यात आली. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा नायनाट होणार आहे. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांचा विषय राजकारणातून आणि समाजकारणातून कायमचा संपणार आहे, असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आज येथे म्हणाले. 

पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. गांधीजींच्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या सर्वसेवा संघाचे दोन दिवसीय अधिवेशन आज पार पडले. यावेळी येथे आले असता मंत्री केदार म्हणाले, आजचं अधिवेशन हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्या देशाच्या सामान्य माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये स्वाभिमानी राहण्याची आणि लढण्याची जी प्रेरणा दिली होती. आपले विचार पक्के करा, असे जे सांगितले. याची परिपूर्ती करणारी आहे. विशेष म्हणजे तशी कृती येथील लोकांनी विशेषतः अविनाश काकडे यांनी करून दाखवली, हे विसरता येणार नाही. पदवीधर निवडणुकीचा विषय महात्मा गांधींच्या परिसरामध्ये सांगणे योग्य होणार नाही. कारण येथे एकमताचा विचार असतो, निवडणुकीचा नाही. त्यामुळे हा विषय मी या परिसरातून बाहेर पडल्यानंतरच सांगू शकेल. 

सर्वसेवा संघाचे दोन दिवसांचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात चंदन पाल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्व सेवा संघाच्या सदस्यांशी चर्चा करण्याकरिता मंत्री केदार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिवेशनात विविध राज्यांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. 
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT