राज्य

खैरे डिप्रेशनमध्ये आहेत, काहीही बरळतात - हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : चारवेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा बॅलेन्स गेला आहे. डिप्रेशनमुळे ते काहीही बरळतात, त्यांनी एखाद्या चांगल्या डॉक्‍टरला दाखवून वैद्यकीय सल्ला घ्यावा, किंवा ध्यान साधना करावी जेणेकरून त्यांना आराम मिळेल अशा शब्दांत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. 

औरंगाबाद शिवसेना शाखेच्या 34 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांच्यावर त्यांच्या कुटुंबाविषयी वैयक्तिक आरोप केले होते. या आरोपांना हर्षवर्धन जाधव यांनी आज उत्तर दिले. जाधव म्हणाले, खैरे यांचा पराभव माझ्यामुळे झाला या रागातून ते आरोप करतायेत. एखादा चांगली मनस्थिती असलेला माणूस कुणाच्या घरातील व्यक्तीबद्दल वैयक्तिक आरोप करू शकत नाही. त्यामुळे मी याआधी देखील खैरेंना तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला होता, आता पुन्हा देतोय. 

खैरेंचा पराभव त्यांच्या कर्तव्यशून्यतेमुळे जनतेने केलेला आहे. लोकशाही असल्यामुळे जनतेचा निर्णय स्वीकारायला हवा. मीही निवडणूक लढलो होतो, मलाही खासदार, पंतप्रधान व्हावे वाटत होते. पण जनतेचा निर्णय, झालेला पराभव मी पचवला, खिलाडूवृत्तीने स्वीकारला. खैरेंनी देखील पराभव स्वीकारून आत्मचिंतन करायला पाहिजे. पण ते माझ्यावर आणि रावसाहेब दानवेंवर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. 

आज जे हयात नाहीत त्या माझ्या वडिलांबद्दल आणि कुटुंबातील अन्य सदस्यांबद्दल भलतेसलते चुकीचे आरोप करणे म्हणजे खैरेंचा असंस्कृतपणा आहे. म्हणून त्यांनी खरोखर तपासणी करून घ्यावी, म्हणजे त्यांना बरे वाटेल असा सल्ला जाधव यांनी दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT