Upsc Exam Topper News karhad- Satara 
राज्य

कऱ्हाडच्या चारुदत्त साळुंखेची युपीएससीत बाजी, आयईएस परिक्षेत देशात पहिला

चारुदत्त याने अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट २०२० परीक्षेत देशात ४८ वा क्रमांक पटकवला होता.

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडीयन इंजिनिअरींग सर्व्हीसेस परिक्षेत कऱ्हाडच्या चारुदत्त साळुंखेने बाजी मारली आहे. त्याने देशात पहिला येण्याचा मान पटकवला आहे. जिल्हा परिषद शाळा आणि कऱ्हाडच्या शिवाजी हायस्कुलमध्ये माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातुन घेवुनही `हम भी कुछ कम नही`,हेच चारुदत्तने सिध्द करून दाखवले  आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ हे चारुदत्त याचे मुळ गाव. त्याचे आई-वडील दोघेही कऱ्हाडला शिवाजी हायस्कुलमध्ये शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कऱ्हाडमध्ये आहे. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्या मंदिरमधुन पूर्ण झाले. त्यानंतर त्याचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कऱ्हाडच्या शिवाजी हायस्कूलमधुन झाले.

हुशारीची चुणुक दाखवत त्याने  दहावीला ९४.५५ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्याने पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधुन मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली. पुणे इंजिनियरींग कॉलेजला असताना कॅम्पस मुलाखतीतून त्याला खास नोकरीच्या संधीही आल्या होत्या. मात्र त्याने त्या नाकारुन शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

चारुदत्त याने अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट २०२० परीक्षेत देशात ४८ वा क्रमांक पटकवला होता. सध्या तो भाभा आटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. आता त्याने इंडीयन इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावुन कऱ्हाडचे नाव देशात मोठे केले आहे. चारुदत्तच्या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT