Arvind-kejariwal 
राज्य

 केजरीवाल सिंदखेडराजामधून फुंकणार 'आप'च्या महाराष्ट्र मोहिमेचे  रणशिंग 

संजय मिस्कीन : सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  : 'जनलोकपाल'चे आंदोलन महाराष्ट्रातून उभे राहिले. त्यातून आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्या महाराष्ट्रातच आम आदमी पक्षाची मात्र अद्याप मुहूर्तमेढ रोवली गेली नसली तरी 12 जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सिंदखेडराजा येथे जाहीर सभा होणार आहे . 

या सभेतून  राज्यात 'आप'ची राजकीय एन्ट्री होणार असल्याचे संकेत आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल राज्यात आम आदमी पक्षाची भूमिका मांडतील, असे समजते. 

कॉंग्रेसचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केजरीवाल यांना सिंदखेडराजाला येण्याचे निमंत्रण दिले होते. ते स्वीकारत त्यांनी जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे.

शंभरहून अधिक कार्यकर्ते सभेच्या तयारीसाठी झटत आहेत. आम आदमी पक्षात राज्यभरातून प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमधे नव्या चेहऱ्यांसोबतच माजी सनदी अधिकारीही असतील, असे समजते. 

दिल्लीत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाने पंजाब व हरियानात जोरदार तयारी केली होती. पंजाबात त्यांना काही प्रमाणात यश आले.

नागरी मानसिकतेचा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख असली तरी पंजाबात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पक्षाने जोरदार रान पेटवले होते.

त्यामुळे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून पक्षाची भविष्यातील वाटचाल राहू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT