राज्य

आमचे वजन वेगळेच; केसरकर जिंकणार नाहीत : निलेश राणे

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत. आमचे वजन वेगळेच आहे, असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत लगावला.
 
यावेळी स्वाभिमानचे संजू परब, पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, सुधीर आडिवरेकर, राजू भालेकर, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, ""वाळू लिलाव झाला नसल्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील व्यावसायिकांना सहन करावा लागला. केवळ पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. याचा राग बाहेर काढण्यासाठी केसरकरांनी हा प्रश्न तसाच ठेवला, ही वस्तुस्थिती आहे; मात्र आज आम्ही हा प्रश्न निकाल लावला आहे.''

श्री राणे पुढे म्हणाले, ""फार्मेलीन संदर्भात गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी आज चर्चा केली. त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले आहे. गोवा- बांबुळी आरोग्य प्रश्नासंदर्भात पुन्हा एकदा राणे यांच्याशी चर्चा करणार आहोत. हा प्रश्न नक्की सोडवला जाईल. लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही कधीही आंदोलन करण्यास तयार आहोत. 

उपरकरांवर टीकास्त्र 

यावेळी त्यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावरही टीका केली. उपरकर यांना पक्षात बोलावण्याइतपत राणेंचे एवढे वाईट दिवस आले नाहीत, असे ते म्हणाले. उपरकर आता विधानसभा लढून, लढून थकले आहेत. त्यामुळे आता त्यांनी ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद लढवावी, असाही टोला त्यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT