Devendra fadanvis press conference  news aurangabad
Devendra fadanvis press conference news aurangabad 
राज्य

खडसे सांगतायेत ते अर्धसत्य, त्यांनी मला व्हिलन ठरवल आहे..

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला याचे मला खूप दुःख झाले आहे, त्यांनी पक्ष सोडायला नको होता. त्यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, ते अर्धसत्य आहे, त्यावर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, मला काही बोलायंच नाही. योग्य वेळ आली की बोलेन. कसं असतं पक्ष सोडण्या सारखा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलंय, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या राजीनाम्यावर उत्तर दिले.

हिंगोली, जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून फडणवीस औरंगाबादेत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे नेते एकनाथ खडसे यांच्या बद्दल मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. खडसेंवर काय आरोप होते, ती केस काय होती, तीन-तीन दिवस प्रसार माध्यमांनी देखील ते प्रकरण लावून धरलं होतं. त्यामुळे यावर मी अधिक बोलणार नाही. एवढेच सांगतो, की खडसे जे सांगतायेत ते अर्धसत्य आहे. पुर्ण सत्य योग्य वेळ आल्यावर मी सांगेन, सध्या मात्र मला त्याबद्दल काहीच बोलायचे नाही.

जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या जाण्याने पक्षावर काय फरक पडेल, म्हणाल तर कुठलाही पक्ष हा मोठाच असतो, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर तो मोठा झालेला असतो. जळगाव जिल्हा मुळातच भाजपचा गड आहे. तो खडसेच्या जाण्यानंतरही कायम राहील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, ्अत्यंत विदारक चित्र आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज आहे. पण सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्र्यांची वक्तव्य बघितली तर त्यांना खरंच शेतकऱ्यांना दिलासा द्यायचायं, की कुरघोडीचे राजकारण कारायचे आहे हेच समजत नाही, अशी टिकाही फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री बोलतात चांगल, पण होत काहीच नाही..

महाराष्ट्राला मी वाऱ्यावर सोडणार नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री बोलतात चांगल, पण प्रत्यक्षात खालची यंत्रणा काहीच करत नाही, आम्हाला कुणालाच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडायचे नाही, पण मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा करू नये, तर त्याची यंत्रणेकडून अंमलबजावणी होते का? याकडेही लक्ष दिले पाहिजे, असा चिमटा फडणवीसांनी यावेळी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT