Central Minister Dr.Bhagwat Karad Reaction on Khairs Statment News Aurangabad
Central Minister Dr.Bhagwat Karad Reaction on Khairs Statment News Aurangabad 
राज्य

खैरेंच्या टीकेवर कराड म्हणाले,`तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा`...

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना मी नगरसेवक आणि दोनवेळा महापौर केले, असा दावा करत त्यांना  भेटायला कशाला जाऊ, असे म्हणणाऱ्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कराड यांनी एका कवितेचा आधार घेत प्रत्युत्तर दिले आहे. अर्थ राज्यमंत्री कराड यांच्याबद्दल खैरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या दाव्या आणि टीकेनंतर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चेला देखील सुरूवात झाली. (On Khaire's comment, Karad said, "No matter how much mud you throw, I will continue to bloom like a lotus") खुद्द कराड यांना देखील खैरे यांची टीका जिव्हारी लागली आणि त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये `तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा`, असे म्हणत खैरे यांना उत्तर दिले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रात औरंगाबादला प्रतिनिधित्व करण्याची संधी मोदी मंत्रीमंडळ विस्तारात मिळाली. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या डाॅ. भागवत कराड यांचा मंत्रीमंडळात समावेश करून त्यांना अर्थ खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले. (Central State Fianance Minister Dr.Bhagwat Karad) मराठावाडा व औरंगाबादसाठी ही अभिमानाची गोष्ट होती. याबद्दल मराठवाड्यासह राज्यभरातून कराड यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत त्यांच्या हितचिंतकांनी गर्दी केली. अजूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.

मात्र या जिल्ह्याचे लोकसभेत वीस वर्ष प्रतिनिधित्व केलेले व शिवसेना भाजप युती असतांना खांद्याला खांदा लावून काम केलेले शिवसेना नेते खैरे यांनी मात्र आपल्या या जुन्या मित्राला साध्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. (Karad was made a corporator, a mayor; Why go to meet them?) यावर भागवत कराड यांना मी नगरसेवक केले, दोनवेळा बाळासाहेबांच्या आशिर्वादाने महापौर केले, मग त्यांना भेटायला मी का जाऊ?  तेच  मला भेटायला येतील, असा दावा त्यांनी केला होता.

आपल्याबद्दल शिवसेना नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य केल्याची सरकारनामाची बातमी जेव्हा अर्थ राज्यमंत्री कराड यांना कळाली तेव्हा कराड यावर व्यक्त झाले. (Shivsena Leader Chandrakant Khaire, Aurangabad) या बातमीचा हवाला देत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून पोस्ट करत खैरे यांना प्रत्युत्तर दिले.

डाॅ. कराड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,  `तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा, आम जनता के आशीर्वाद और खुद की मेहनत से यहां तक पहुंचा हु, मैं एक निष्ठा से उन का काम करता रहूंगा। मेरे नेता और गुरु गोपीनाथ मुंडे जी का सपना साकार करने के लिए, मैं दिन रात मेहनत करूंगा. आप के अपमान को सहते रहूंगा, पर देश के लिए काम करता रहूंगा। तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा`.

खैरे यांनी नगरसेवक आणि दोनवेळा महापौर केल्याचा दावा यातून खोडून काढला आहे. आपले राजकीय गुरू आणि नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच आपण या स्थानापर्यंत पोहचलो आहोत, असेही कराड यांनी ट्विटमधून निक्षूण सांगितले. सर्वसामान्यांचे आशिर्वाद आणि स्वतःच्या कष्टावर आपण या पदापर्यंत पोहचल्याचे देखील कराड यांनी अधोरेखित केले. मी एकनिष्ठेने, रात्रंदिवस काम करून माझ्या नेत्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहीन. तुम्ही माझा कितीही अपमान केला तर तो मी सहन करीन, पण देशासाठी काम करतच राहील, असेही कराड यांनी आपल्या ट्वीटमधून सांगितले.

तुम्ही आता वेगळ्या उंचीवर...

यावर अनेकांनी कराड यांचे समर्थन करत `तुम्ही आता एवढ्या उंचीवर पोहचला आहात, की तुम्हाला आता तिथून खालची घाण दिसायलाच नको, आणि त्यावर तुम्ही व्यक्त तर व्हायलाच नको, अशा प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. मोदी सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये वर्षभरापुर्वीच खासदार झालेल्या डाॅ. भागवत कराड यांना थेट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागली. राज्यसभेवर कराड यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर खैरे यांनी डाॅ. कराड यांना स्वतः फोन करून आपल्या संपर्क कार्यालयावर भेटीचे आमंत्रण दिले होते.

कराड यांचे पेढा भरवून स्वागत करणाऱ्या खैरे यांनी ते मंत्री झाल्यावर मात्र त्यांना शुभेंच्छांचा फोन किंवा दिल्लीत असून भेट देखील घेतली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतांनाच कराड यांना नगरसेवक आणि महापालिकेत दोनवेळा महापौर मीच बाळासाहेबांच्या आशिर्वादाने केले होते. ते आता खासदार आणि केंद्रात मंत्री झाले असतील, पण मी त्यांना भेटायला का जाऊ? तेच मला भेटायला येतील, असा दावा मुलाखतीत केला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT