Kopargaon MLA Ashutosh Kale Meets Sharad Pawar for Godavari Water
Kopargaon MLA Ashutosh Kale Meets Sharad Pawar for Godavari Water 
राज्य

गोदावरीच्या पाण्यावर  तोडगा काढा ,आमदार काळेंचे शरद पवारांना साकडे

सरकारनामा ब्युरो

कोपरगाव  : कोपरगाव विधानसभा मतदारसंघ पर्जन्यछायेखाली येतो. त्यातच गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी 'जायकवाडी'ला जाते. त्यामुळे शेती व्यवसाय बेभरवशी झाला आहे. कोपरगाव शहरासह मतदारसंघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशा आशयाचे निवेदन त्यांना दिले, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

काळे म्हणाले, "गोदावरी खोरे अतीतुटीचे असूनही नगर, नाशिकच्या धरणांतून अनेक वेळा 'जायकवाडी'ला पाणी सोडण्यात येते. त्यातून नगर, नाशिक व मराठवाडा, असा प्रादेशिक वाद निर्माण झाला आहे. हा तिढा आपण सोडविला पाहिजे. राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना कोणत्याही अटी- शर्तीविना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.'' 

या वेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT