for Krishna Sugar factory election today voting
for Krishna Sugar factory election today voting  
राज्य

कृष्णा कारखान्यासाठी चुरशीने ३५ टक्के मतदान

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी आज शांततेत मतदान प्रकिया सुरू असून सकाळी अकरा वाजेपर्यंत १४८ मतदान केंद्रांवर सरासरी ३५ टक्के मतदान झाले होते. सकाळी सर्व निवडणूक लढणाऱ्या तीनही पॅनेलच्या प्रमुखांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांचा समावेश आहे. for Krishna Sugar factory election today voting  

कोविडच्या पार्श्वभूमीवर होणारी कृष्णा कारखान्याची निवडणुकही चुरशीची होत आहे. २१ जागांसाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत. ४७ हजार १६० मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अनपेक्षितपणे चुरशीची झाल्याने निवडणुकीत रंग आला आहे. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली.

कृष्णा काठावरील गावागावातील मतदारात उत्साह होता. रेठरे बुद्रूक, रेठरे खुर्द, वाठार, काले, वडगांव हवेली, कार्वे, कोडोली भागात उत्साह जाणवत होता. कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. मात्र, पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामुळे त्यांच्या उत्साहावर निर्बंध आल्याचे दिसत होते. मतदान केंद्रावर मोबाईल बंदी होती. अनेकांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते. अधिकृत ओळखपत्राशिवाय मतदानही करून दिले जात नव्हते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT