Minister of State for Home Shambhuraj Desai
Minister of State for Home Shambhuraj Desai 
राज्य

बेकायदेशीर दारूविक्रीचे प्रकार थेट मला कळवा, कडक कारवाई करू : शंभूराज देसाई

सरकारनामा ब्यूरो

भुईंज (ता. वाई) : पोलिस दल सर्वत्र आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावत आहे. तरीही बेकायदा दारुविक्रीबाबत तक्रारी असून त्याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधिका-यांना कडक कारवाईचे आदेश देत आहे. त्याचबरोबरच असे प्रकार कोठे होत असतील तर थेट मला कळवा, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी वाई येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
वाई येथील क्वारंटाईन कक्ष, कंटेन्मेंट झोन, वाई शहरातील प्रवेशव्दारावरील नाकाबंदी आदीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराज देसाई म्हणाले, कोरेना संसर्ग रोखण्यसाठी गृहमंत्री म्हणून प्रयत्नपूर्वक काही उपाय योजना केल्या आहेत.

साताराशहर मोठे असल्याने तेथे काही उपाय योजना करण्याबाबत लॉकडाउनच्या आदल्या दिवशी पोलिस अधीक्षक आणि महसूलच्या अधिका-यांशी चर्चा करून निर्णय्र घेतला. त्या अनुषंगाने काल परवा मी आणि पालकमंत्री यांनी कराड भागांची पाहणी केली. मोठ्या लोकसंख्येच्या गावांत पोलिस व महसूल विभागाने काय उपाय योजना केल्या आहेत.

त्याची मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सुचनेनुसार लॉकडाउन वाढवयचा किंवा अंशतः कमी करायचा याबाबतही महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. संपूर्ण वाई शहरच कंटेन्मेट झोनमध्ये आले आहे. त्यामुळे फक्त जीवनावश्यक सेवा सुरु आहेत. पोलिस दलावर प्रचंड ताण आहे.

अधिकारी कर्मचारी गेली तीन महिने पहिल्या लॉकडाउनपासून चौवीस बाय सात फिल्डवर काम करीत आहेत. त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. पण कुठेही जाणीवपूर्वक हलगर्जीपणा झालेला नाही. वाईत प्रशासन व लोकप्रतिनिधींचा चांगला समन्वय दिसून आला.

मकरंद पाटील यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासकिय अधिका-यांना दिले आहेत. महसुल, पोलिस, आरोग्य या यंत्रणेचा आढावा घेतला असता त्यांचे काम समाधानकारक वाटले. या व्यतिरिक्त लोकांच्या काही अडचणी असल्या तर मला कळवा. त्याची मी दखल घेईन, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सातारा सातारा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT