राज्य

तानाजी सावंत यांच्या रुपाने माढ्याला पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी

शिवसेनेचे उपनेते डॉ. प्रा. तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने प्रा. सावंत यांच्या रूपाने माढा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रीपदाची ‌संधी मिळली आहे.

किरण चव्हाण

माढा : शिवसेनेचे उपनेते डॉ. प्रा. तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने प्रा. सावंत यांच्या रूपाने माढा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रीपदाची ‌संधी मिळली आहे. 

माढा तालुक्यातील वाकाव येथील प्रा. तानाजी सावंत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात तर भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. शिवाय जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे, शिवजलक्रांतीच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, जनावरांसाठी चारा पाणी सारखी सामाजिक कामे करत प्रा. सावंत यांनी शिक्षण, उद्योग व सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. 

सोलापूर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक व उद्योग क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. या कामाची दखल घेत शिवसेनेने त्यांच्यावर राज्याच्या शिवसेना उपनेते पदाची धुरा सोपवली. त्यानंतर प्राध्यापक सावंत हे वाशिम मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्यावरती सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याची संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. 

प्रा. सावंत यांच्या कामाची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. प्रा. सावंत यांच्या रूपाने माढा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात शिवसेना-भाजप आणि सावंत समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. 

माढा तालुक्याला आतापर्यंत मंत्रीपदाने हुलकावणीच दिली आहे.  मात्र प्रा. सावंत यांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळाल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. यानिमित्ताने माढा तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधांसह इतर अनेक  प्रश्न मार्गी लावण्यास संधी मिळणार आहे.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT