Shivsena Mla Ramesh Bornare- R.M.Wani News Aurangabad 
राज्य

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब अन् वैजापूरात वाणी साहेबांचा शब्दच अंतिम असायचा..

नांदुर मधमेश्वर कालव्याचे जनक असलेले आर. एम. वाणी नेहमीच वैजापुरच्या विकासासाठी नहेमीच आक्रमक राहिले.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हा जसा शिवसैनिकांसाठी अंतिम असायचा, तसाच दिवंगत माजी आमदार आर.एम. वाणी यांचा वैजापूरातील शिवसैनिकांसाठी असायचा. (In Maharashtra, Shiv Sena chief Balasaheb and in Vaijapur, Wani Saheb's words used to be final.) वाणी साहेबांना वैजापूर तालुक्याचा, मतदारसंघाचा जो विकास अपेक्षित होता, आहे, तोच यापुढील काळात केला जाईल, असा शब्द देत वैजापूरचे शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी आपल्या राजकीय गुरूंना श्रद्धांजली वाहिली.

पंधरा वर्ष वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलेले माजी शिवसेना आमदार आर.एम. वाणी यांचे आज पहाटे निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Shivsena Mla Ramesh Bornare) यावेळी वैजापूर तालुक्यासह जिल्हा व मराठवाड्यातून त्यांच्या दर्शनासाठी शिवसैनिक, पदाधिकारी आले होते. यावेळी श्रद्धांजली सभेत बोलतांना आमदार बोरनारे यांना अश्रु अनावर झाले.

शिवसेना शाखाप्रमुख, शहप्रमुख, तालुकाप्रमुख ते आमदार असा आपला राजकीय प्रवास हा वाणी साहेबांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखालीच घडल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. (Let.Ex. Mla R.M.Wani, Vaijapur) महाराष्ट्रात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द जसा शिवसैनिकांसाठी अंतिम असायचा तसाच वैजापूर तालुक्यातील शिवसैनिकांसाठी वाणी साहेबांचा असायचा, याचा खास उल्लेख बोरणारे यांनी केला.

तालुक्याच्या विकासासाठी जी स्वप्न वाणी साहेबांनी पाहिली होती, ज्या अपेक्षा बाळगल्या, त्याच मार्गाने आम्ही पुढे काम करू, असे वचन मी त्यांना स्मरूण देतो, असेही बोरणारे यांनी यावेळी सांगितले. वैजापूर तालुक्यात गेली अनेक वर्ष शिवसेना मजबुतीने उभी आहे,त्याचे श्रेय वाणी यांनाच जाते. शिवसेनेच्या सर्व अंगिकृत शाखांचे गावागावात पदाधिकारी, कार्यकर्ते तयार करण्याची त्यांची एक निश्चित कार्यपद्धती होती.

शिस्त मोडलेली त्यांना अजिबात आवडत नसल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यांचा शिवसेनेचे हेडमास्तर म्हणून उल्लेख करायचे.  कार्यर्त्यांचे, लोकप्रतिनीधींचे वाचन असले पाहीजे, त्यांनी स्थानिक प्रश्नांवर बोलले पाहीजे.  केलेलं काम घराघरात जावून सांगणारा कार्यकर्ता घडवला पाहीजे, फक्त नेत्यांमागे फिरणारे कार्यकर्ते नको, असं ते नेहमी सांगायचे. गल्लीपासून दिल्लीच्या प्रश्नांवर अभ्यासाने बोलणारी तरुणांची मोठी फळी वाणी यांनी वैजापुरात तयार केली.

नांदुर मधमेश्वर कालव्याचे जनक असलेले आर. एम. वाणी नेहमीच वैजापुरच्या विकासासाठी नहेमीच आक्रमक राहिले. मी जनतेचे काम करतो, पैसे वाटणार नाही, या भूमिकेवर ते कायम राहिले. १९९९ ते २००९ दरम्यान, आमदार असतांना त्यांची विधानसभेतील भाषणे, तारांकीत प्रश्न अधिकाऱ्यांना घाम फोडणारे असायचे. सलग तीन टर्म वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांचा अनपेक्षित पराभव झाला.

पण त्यानंतरही तालुक्याच्या विकासासाठी ते झटत राहिले. पराभवाबद्दल राग किंवा संताप कधी केला नाही.  माजी आमदार असतांनाही ते लोकांचे आमदार म्हणून कायम कार्यरत राहीले.  नेत्यांच्या मागेपुढे करणे, वरवर करणे हे त्यांना कधीच आवडले नाही. पक्षाच्या चुका, चुकीचे धोरण यावरही ते जाहीरपणे बोलायचे.  जाहीर सभा असो की पक्षाची बैठक ते कधी डगमगले नाही.

उमेदवारी नको सांगणारा दिलदार नेता..

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फटका शिवसेनेला वैजापूरात बसला. भाजप उमेदवारामुळे मतांचे विभाजन झाले आणि सलग पंधरा वर्ष वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे वाणी पराभूत झाले. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे ते पक्षाच्या कार्यक्रमात देखील ते फारसे दिसले नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवसैनिकांची त्यांच्या घरासमोरील गर्दी कायम होती.

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते मतदारसंघातील विविध विकासकामावर त्यांचे मत जाणून घेतले जायचे, नव्हे त्यांची भूमिका त्यात महत्वाची असायची. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा जेव्हा विषय आला तेव्हा. पाचव्यांदा वाणी यांनाच मैदानात उतरवण्याची तयारी मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली. वाणी साहेब तुम्हीच लढा तुम्हाला मंत्री करायचे आहे, असे नेते सांगायचे.

पण आता मला उमेदवारी नको, माझी प्रकृती बरी नसते, मी थकलो आहे. निवडणूक लढून जनतेचे प्रश्न जर मी विधानसभेत मांडू शकलो नाही, ते सोडवू शकलो नाही, तर मग काय उपयोग. त्यापेक्षा नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांला संधी द्या, अशी भूमिका वाणी यांनी तेव्हा घेतली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आग्रह करून देखील वाणी यांनी त्यास नम्र नकार देत तत्कालीन तालुकाप्रमुख प्रा. रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली. शिफारस केली असली तरी अंतिम निर्णय आपण घ्या, जो उमेदवार द्याल, त्याला निवडून आणू, असा शब्द वाणी यांनी दिला होता. वाणी यांच्या शब्दाला मान देत शिवसेनेने बोरनारे यांना उमेदवारी दिली आणि ते प्रचंड मताधिक्याने विजयी देखील झाले. या विजयात देखील वाणी यांचा सिहांचा वाटा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT