साजीद खान
Mahur Accident News : माहूर तालुक्यातील वाई बाजार जवळ माहूर - किनवट राष्ट्रीय महामार्गावर आज (ता. १२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण कार अपघात झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी येथील आंदोलनकर्त्यांचा यात समावेश आहे.
जखमींना माहूर Mahur येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धनगर आरक्षणाचे नेते तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
परभणी जिल्ह्यातील पालम येथील सरफराजपूर गावातील काहीजण नागपूर येथे धनगर आरक्षण मोर्चाला गेले होते. नागपूरवरून चंद्रपूर जिल्ह्यातील पाहुण्यांची भेट घेऊन परत येत असतानाच पहाटे पाच वाजेच्या सुमारास माहूर तालुक्यातील वाई बाजार जवळ कार्यकर्त्यांची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.02 बी.पी.9836 अज्ञात वाहनावर पाठीमागून आदळल्याने झालेल्या या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतकांमध्ये पालम तालुक्यातील सरफराजपूरचे सरपंच लक्ष्मण उर्फ राजू पंडितराव वाघमारे (वय 42) आणि माजी सरपंच रमेश दत्तराव वाघमारे (वय 52) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये चालक रंगनाथ संपथराव वाघमारे, राम बालाजी बनसोड व बापूराव मारोती वाघमारे यांचा समावेश आहे. दरम्यान हा अपघात पहाटेच्या वेळेस पडत असलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला समोरील वाहनाचा अंदाज आला नसल्याने घडल्याची सर्वत्र चर्चा आहे.
( Edited by Amol Sutar )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.