Minister Abdull Sattar Sarkarnama
राज्य

सेना-भाजप युतीची भाषा करणाऱ्या सत्तारांनी करून दाखवले; औरंगाबादमध्ये फडकवला युतीचा झेंडा

अब्दुल सत्तरांनी (Abdul Sattar) केलेली सेना-भाजप (Shivsena & BJP) युती दूध संघात यशस्वी ठरली आहे.

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (Aurangabad District Milk Producers Association Election) अपेक्षेप्रमाणे सर्वपक्षीय पॅनलची सरशी झाली. यामुळे जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तरांनी केलेली सेना भाजप युती दूध संघात यशस्वी ठरली असून संचालकांच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप (BJP) नेते व संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्यासह सर्वपक्षीय पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.

या निवडणुकीत औरंगाबाद तालुका मतदारसंघातून बागडे यांना २७४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेस पठाडे यांना ६५ मते मिळाली. कन्नड तालुका मतदारसंघातून गोकुळसिंग राजपूत (२६९) यांनी सुरेश चव्हाण, संतोष पवार (प्रत्येकी ३६ मते) यांचा पराभव केला. फुलंब्री तालुका मतदारसंघातून संदीप बोरसे (३३०), वैजापूर तालुका मतदारसंघातून कचरू डिके (२८६) हे विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांवर अलका रमेश डोणगावकर (२८३) आणि शिलाबाई कोळगे (२७३) , तर भटक्या विमुक्त जाती- जमाती मतदारसंघातून पुंडलिक काजे (२५०) यांनी विजय मिळविला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, (Bhagwat Karad) महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, (Abdul Sattar) हरिभाऊ बागडे, डॉ. कल्याण काळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. बागडे हेच दूध संघाचे अध्यक्ष होतील, असा दावा सत्तार यांनी केला आहे. यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे समर्थक संचालक नंदलाल काळे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

दरम्यान, सत्तार यांनी राज्यात भाजप व शिवसेना युतीबद्दल भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी व मुख्यमंत्री पदाच्या पदभाराबद्दल वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांना स्वपक्षाच्या नेत्यांच्या रोषाला सोमोरे जावे लागले होते, तर, भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती. मात्र, दुध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-सेना युती करत युतीची ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या विजयामुळे पुन्हा एकदा दबक्या आवाजात युतीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT