कोपरगाव : घरकुलासाठी एक गुंठ्याची खरेदी सवलत मिळाल्याने कोपरगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची अडचण दूर झाली. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यासाठीच्या उपाय योजना प्राधान्याने राबवा, अशा सूचना पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
पंचायत समितीच्या वार्षिक आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी पंचायत समिती प्रशासनाला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या वेळी यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जिल्हा परिषद सदस्य सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य श्रावण आसणे, अनिल कदम, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपगटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे आदी उपस्थीत होते.
काळे म्हणाले, की ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठीच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात. 14 व्या वित्त आयोगातील शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा. 15 व्या वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीतून लोकांच्या गरजेच्या कामांना प्राधान्य द्यावे. कामाची गुणवत्ता चांगली राहील याची काळजी घ्यावी.
कोपरगाव तहसील कार्यालयातील फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपूरावा केला. महसूल विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला. आता त्यासाठी एक कोटी त्र्यान्नव लक्ष एकोणपन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी आमदार अशोक काळे यांनी तहसिल कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी निधी मंजुर करून आणला होता, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
हेही वाचा...
या कारणाने शेतकऱ्यांनी मानले झावरेंचे आभार
टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी शुक्रवारी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महावितरण ने पुणे जिल्ह्याला जोडणारी वीज तोडल्यानं वीजपंपाना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत आहे शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील वासुंदे, खडकवाडी, वारणवाडी, पळशी, पोखरी, मांडवे खुर्द, देसवडे यांसह परिसरातील वीजपपांना पूर्ण दाबाने विजपुरवठा होत नसल्याने शेतातील पिकांना पाणी भरताना शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. झावरे यांनी या बाबीचा अभ्यास करत नेमके कारण शोधले व आपली वीज ही पुणे जिल्ह्यातील गावांना वितरीत करण्यात येत असल्याचे समोर आले. तालुक्यातील शेती पंपाना वीज उपलब्ध होत नसताना पारनेर तालुक्याची वीज पुणे जिल्ह्यास देणे, ही अंत्यत चुकीची बाब आहे. शेतकऱ्यांना व परिसरातील सरपंचासह झावरे यांनी पारनेर येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यानंतर पुण्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याचे उपअभियंता प्रशांत आडभाई यांनी सांगितले.
यामुळे तात्काळ तालुक्यातील या गावांना पुर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरू झाला, याबाबत वारणवाडी येथील शेतकरी भोमा काशिद यांनी स्वतःच्या शेतातील कुपनलिकेच्या पाण्याचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर टाकत हे ठिकाण आहे.
Edited By - Murlidhar Karale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.