MLA Sandeep Dhurve 
राज्य

सरपंचांना मुदतवाढ देण्यासाठी आमदार धुर्वेंनी पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र 

ग्रामपंचायतींची संख्या बघता यवतमाळ जिल्ह्यात विस्तार अधिकाऱ्यांची संख्या अल्पप्रमाणात आहे. गाव पातळीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सरपंच व सदस्यांसह कार्यकारीणी कोरोना विषाणुच्या विविध उपाय योजना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

बबलु जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : देश, राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणा कोरोनाच्या लढ्यात गुंतली आहे. अशातच काही ग्रामपंचायतींची मुदत संपत आली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सद्यस्थितीत घेऊ नये. अशा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आर्णीचे आमदार डॉं. संदीप धुर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

सद्यस्थितीत राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शासनाने फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 लागु करुन जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे राज्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निवडणुक विभागाने स्थगित केल्या. ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे, त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करुन सदरचे कामकाज करावे, असा शासनाचा आदेश आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात एक हजार ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असून कोरोना विषाणू च्या पाश्वभुमीवर सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेता तेथे प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी यांना नियुक्त करण्यात येणार आहे. 

सध्याची ग्रामपंचायतींची संख्या बघता यवतमाळ जिल्ह्यात विस्तार अधिकाऱ्यांची संख्या अल्पप्रमाणात आहे. गाव पातळीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सरपंच व सदस्यांसह कार्यकारीणी कोरोना विषाणुच्या विविध उपाय योजना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. तेव्हा, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरपंच तथा सदस्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT