नगर : गेल्या सरकारमध्ये आमदार निलमताई गोऱ्हे यांना मंत्रीपद मिळेल, असे वाटले होते. महाविकास आघाडीतही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, असे वाटले, परंतु तीन पक्षाचे सरकार असल्याने ते शक्य झाले नाही. परंतु उपसभापतीपदही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे निलमताई तुम्ही आमदारांना न्याय देण्याची जबाबदारी पार पाडू शकतात. आमचे सहकार्य कायम असेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निलम गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या आमदार डाॅ. निलम गोऱ्हे यांची आज बिनविरोध निवड झाली. सर्व सदस्यांनी त्यांच्या नावावर टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. विधानपरिषदेत त्यांच्या निवडीबद्दल प्रस्ताव मांडल्याबरोबर सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभापतींनी जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डाॅ. गोऱ्हे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कामाचे काैतुककेले. ते म्हणाले, की निलमताई गोऱ्हे यांचे मनापासून अभिनंदन करतो. विधानपरिषदेत सभापती असो किंवा उपसभापती असोत, त्यांची निवड बिनविरोध होणे आवश्यक असते. त्या पदावर व्यक्तीला काम करण्यासाठी त्यामुळे निश्चित मदत होते. महाराष्ट्र विधानपरिषदेला गाैरवशाली परंपरा आहे. क्रांतीकारी निर्णयाची परंपरा पहात आलेलो आहेत. अनेक दिग्गजांनी काम केले आहे. त्यामध्ये गवई, डावखरे, वहाडणे अशा अनेकांनी सभापती, उपसभापती या पदांवर काम केले आहे. निलमताई स्वतः पुणे जिल्ह्यातील आहेत. मीही पुण्यातील आहे. आमच्या अनेकदा चर्चा होत असताना विविध विषयांवर चर्चा होते. निलमताईबद्दल सांगायचं म्हटलं, तर गेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल, असे वाटले होते. महाविकास आघाडीतही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, असे वाटले, परंतु तीन पक्षाचे सरकार असल्याने ते शक्य झाले नाही. उपसभापतीपदही तितकेच महत्त्वाची आहे. त्यामुळे निलमताई तुम्ही आमदारांना न्याय देण्याची जबाबदारी पार पाडू शकतात. तुम्ही आमदारांना न्याय दिला, म्हणजेच संबंधित मतदारसंघातील जनतेला न्याय दिला असे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्याकडे लक्ष असल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांदा उपसभापतीपदाची संधी मिळाली. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून अनेकदा निलमताईंना यापूर्वी पाहिले आहे. त्यांना नेहमीच ऐकत आलो आहोत. आता प्रत्यक्षात सभागृहात ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्या व्यावसायाने डाॅक्टर आहेत. निलमताईंच्या सामाजिक कार्याचा आढावा घ्यायचा, तर मोठी यादी येईल. पंचायत राज असेल, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर शेकडो व्याख्याने महाराष्ट्रभर जाले आहेत. अशा प्रकारे आज संवेदनशील, साहित्यिक अशा उपसभापती लाभले. त्याबद्दल निलमताई यांना खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.
कोठेवाडीसारख्या घटनांत त्या कायम पुढे असतात
डाॅ. गोऱ्हे यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विधान परिषदेचा सदस्य झाल्यानंतर प्रथमच सभागृहात आलो. सभागृहाच्या सदस्य निलम गोऱ्हे या उपसभापतीपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्या अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. शिवसेनेच्या त्या उपनेत्या आणि सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांच्या मुलभूत हक्कासाठी संघर्ष करणे. कुठेही दुर्गम भागात सुद्धा अशा काही घटना घडल्या की त्या प्रथम धावून जातात. कोठेवाडीची घटना असेल, की कोणतीही घटना असेल, तर त्या धावून जातात. नुसताच कोरडा दिलासा न देता त्या कुटुंबाला आधार देतात. कुटुंबियांकडून कोणत्याही दबावाला बळी न पडता माहिती सांगण्याबाबत त्या स्वतः कुटुंबाशी विश्वासात घेऊन त्यांना बोलते करून न्याय मिळवून देतात. निलमताई अनेक वर्षे या सभागृहाच्या सदस्या आहेत. विधानपरिषद सदस्य म्हणून त्या प्रभावी काम करतात. सभागृहाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या यशाची कमान उंचावित राहो, या शुभेच्छा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.