Babanrao pachpure.jpg
Babanrao pachpure.jpg 
राज्य

आमदार पाचपुते यांनी केले सावध, या नियमांची सक्तीने अंमलबजावणी कराच !

संजय आ. काटे

श्रीगोंदे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेऊन श्रीगोंदे तालुक्‍यात कोरोना नियमांची पुन्हा सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रशासनास केल्या. तसेच, शंभरपेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा आयोजित न करणाऱ्यांना नोटिसा बजावणे व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आमदार पाचपुते यांनी तालुक्‍यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या वेळी तहसीलदार प्रदीपकुमार पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर उपस्थित होते. 

तालुक्‍यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. आमदार पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत, कोरोना वाढू न देण्यासाठी सर्व प्रकारची तयारी ठेवा, असे सांगितले.

तसेच, त्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. तहसीलदार पवार म्हणाले, ""मंगल कार्यालयांनी लग्नसमारंभात 100पेक्षा कमी लोक उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, अशा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. शाळांमध्ये ज्या मुलांना ताप, सर्दी- खोकल्याची लक्षणे दिसत असतील, त्यांना घरीच ठेवून त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी डॉक्‍टरांनाही, तापाची लक्षणे असणाऱ्या रुग्णाला परत न पाठवता त्याची कोविड चाचणी करण्याबाबत सांगण्यात आले आहे. यासह सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.'' 

हेही वाचा...

माजी विद्यार्थ्यांची सात लाखांची मदत 

श्रीगोंदे : जेथे बालपणीचे शिक्षण घेतल्या ते विद्यालय सुसज्ज हवे ही धारणा ठेवून मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल विद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि सद्या चांगल्या ठिकाणी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी सहा लाख 77 हजार रुपयांची मदत केली.

विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक व सेवक यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या चाळीस वर्षांपासून शिकलेल्या माजी विद्यार्थी व स्थानिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अध्यक्षस्थानी प्रभाकर रसाळ होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे विभागीय सहाय्यक अधिकारी शिवाजीराव तापकीर होते. वैभव इथापे, दत्तात्रय झिटे, संजय भोसले, जयदीप मांडे, उमाकांत राऊत यांनी प्रातिनिधिकरित्या धनादेश दिले अथवा निधी देण्याचे कबूल केले. मुख्याध्यापक व  सर्व सेवक व कर्मचारी यांनी सव्वा लाखाची देणगी जमा केली. रयत संस्थेने पंधरा लाखाची केलेली मदत प्रमुखांनी मुख्याध्यापक व शिक्षकांकडे दिली.

Edited By - Murlidhar Karale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT