raj thackeray
raj thackeray  sarkarnama
राज्य

राज्यपालांच्या वक्तव्याचा राज यांनी घेतला ठाकरी शैलीत समाचार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अर्थात मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आज (ता.9 मार्च) पुण्यामध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मनसे नेते बाळा नांदगावकर (Balasaheb Thackeray) यांनी भाषण केले असून आता निवडणुका लढवायच्या नाहीत तर जिंकायच्या आहेत, असे म्हणत हम होंगे कामयाब कामयाब गाणे गायले यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली आहे.

जमलेल्या हिंदू माता भगिनींनो आणि बांधवांनो, अशा वाक्याने राज यांची भाषणाला सुरवात. गेली दोन वर्षे मी भाषण केले नाही. मुलाखती दिल्या. पाच मिनिटे, दहा मिनिटे बोललो. पण भाषण नाही केलं. दोन वर्षे मी कुठे काही बोललोच नाही. मी काय बोललो नाही. तुम्ही पण काही बोलला नाही. त्याच्यामुळे आज वर्धापनदिनाला भाषण करताना प्रॅक्टिस सुटली नाही ना, अशी शंका येत होती. मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद व्यक्त करतो, अश्या शब्दात त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, कोरोनासारखे दिवस पाहू, असे वाटले नव्हते. सहज स्पर्श करायला भीती वाटायला लागली. घरातल्या माणसाने दिलेला ग्लास उचलावा की न उचलावा, अशी शंका यायला लागली आहे. दरम्यान आपल्या पक्षावर, माझ्यावर संकट सुरूच आहेत. संकट येतात तेव्हा ती हातात हात घालून येतात. जाताना एकटी जातात. त्यामुळे वेळ लागतो. माझ्याही आयुष्यात आली. पक्षाच्याही आयुष्यात आली. असे प्रसंग येत असतात. पण या प्रसंगातून घाबरून न जाता हे प्रसंग आपल्याला शिकवून जातात. यातून आपण घेतलं काय, या सर्व गोष्टी घेऊन कुठे जाणार आहोत, हे समजायला हवं. माझे मनसैनिक याही काळात माझ्याबरोबर राहिलात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतात. फक्त लतादिदींच्या आयुष्यात तो आला नाही. मात्र त्यांना ते सहज जमलं नाही. त्यांनी प्रचंड कष्टातून दिवस काढले. आम्हाला इतिहास नाही बघायचा. जात बघायची आहे. राजकीय पक्षांना तुम्हाला जातीपातीत अडकवायच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठाकरेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही यावेळी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्हाला (राज्यपालांना) शिवाजी महाराज, रामदासस्वामी काही कळत का? तुमचा काही अभ्यास आहे का? छत्रपतींनी कधी सांगितलं नाही की रामदासस्वामी माझे गुरू नव्हते की रामदासस्वामी म्हणाले नाहीत की ते माझे शिष्य आहेत. तुमच्या वक्तव्यांमुळे शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि रामदासस्वामींची विद्वता कमी होती. रामदासस्वामी यांनी छत्रपतींबद्दल जे लिहिलयं तसे आतापर्यंत कोणी लिहिलं नाही. ते माझ्या घरात मी लावलेलं आहे. श्रीमंत योगी, असं रामदासस्वामींनी लिहून ठेवलयं. आमच्या महापुरूषांना बदनाम करून तरुणांची माथी भडकावयची. एवढाच उद्योग चाललयं, असा हल्लाबोल राज यांनी राज्यपाल आणि सर्वच पक्षांवर केला आहे.

राज्यपालांना भेटीसाठी गेल्याचा किस्साही राज यांनी या वेळी सांगितला. आपण हात पुढे केला तेव्हा ते पण हस्तांदोलनासाठी हात पुढे करतील, असे वाटत होते. पण त्यांनी माझा हात हातात घेतला आणि तुमच मंगळ असा आहे आणि बुध असा आहे, असे सांगायला सुरवात केली. कुडमुड्या जोशीप्रमाणे. तुम्हाला त्यातील काही कळतं का? तरी जातात अक्कल शिकवायला, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहाबद्दलही राज्यपालांनी टिप्पणी केली होती. त्यावरही राज यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT