Hammer Court
Hammer Court 
राज्य

मोमीनपुऱ्यातील बकरामंडी न्यावी एपीएमसीत, न्यायालयाचे मुंढेंना आदेश 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : मोमीनपुऱ्यातील बकरामंडी तात्काळ कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात स्थानांतरित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले. महानगरपालिका उपायुक्तांनी 4 मे रोजी वादग्रस्त आदेश जारी करून ही बकरामंडी वाठोडा येथे स्थानांतरित केली होती. त्याविरुद्ध उमेश उतखेडे, कृष्णा मस्के व दिनेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

याचिकेनुसार, मोमीनपुरा येथे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, महानगरपालिका आयुक्तांनी 12 एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे मोमीनपुऱ्याला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. परिणामी, या क्षेत्रातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाही व बाहेरचे नागरिक या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही. असे असताना मोमीनपुऱ्यातील बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित करण्यात आली. महापालिका उपायुक्तांचा आदेश महापालिका आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. वाठोड्यातील जागा क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजजवळ आहे. 

बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वाठोड्यातील नागरिकांना दिलासा देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. कार्तिक शुकुल यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT