MLC Jayant asgaonkar
MLC Jayant asgaonkar 
राज्य

महाविकासच्या एकोप्यामुळे पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील मक्तेदारी मोडीत : जयंत आसगावकर

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघावर ठराविक लोकांची असणारी मक्तेदारी मोडण्यात यश आले आहे, असे मत नवनिर्वाचित शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले. 

आमदार आसगावकर यांचा काँग्रेसच्यावतीने ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कऱ्हाड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, काँग्रेसचे युवा नेते इंद्रजित चव्हाण, नगरसेवक आप्पा माने, प्रा. धनाजी काटकर, अशोकराव पाटील-पोतलेकर, जगदीश निकम उपस्थित होते.

 आमदार आसगावकर म्हणाले, कऱ्हाड तालुक्यातील मतदार व कार्यकर्ते यांनी चांगले काम केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यानेच विजयश्री खेचून आणता आली. त्या माध्यमातुन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर असणारी ठराविक लोकांची मक्तेदारी मोडण्यात यश आले आहे. यापुढेही शिक्षक, कार्यकर्ते यांना माझ्यापरीने सर्वोतपरी सहकार्य करेन.

ॲड. पाटील- उंडाळकर म्हणाले, सातारा जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात काम केल्याने दोन्ही उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. यापुढेही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये याच पद्धतीने कामकाज करून विजयश्री खेचून आणली जाईल. त्यासाठी कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT