MP Shrinivas Patil Drive Tractor
MP Shrinivas Patil Drive Tractor 
राज्य

ट्रॅक्टर चालवत खासदार श्रीनिवास पाटलांनी केली पेरणी

सरकारनामा ब्यूरो

उंडाळे (ता. कऱ्हाड) : भर पावसात साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी असलेल्या प्रेमापोटी धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे शासनाच्या शेतकऱ्यांना बाधावर खते बी बियाणे वाटप योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खते बियाणे चे वाटप केले. तसेच शेतात बी बी एफ् यंत्राव्दारे ट्रॅक्टरने खरीप सोयाबीनची पेरणीही केली.

 राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे व खते बांधावर देण्याची घोषणा केली आहे. यानुसार उंडाळे मंडल कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या धोंडेवाडी येथे आज भरपावसात शेतीप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत शेतकरी रामचंद्र कोळेकर, बाळासाहेब कोळेकर यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवत सोयाबीनची पेरणी केली.

ट्रॅक्टरला जोडलेल्या बीबीएफ् यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी कृषी विभागाने सोयाबीनवर बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक दाखविले. ही बीजप्रक्रिया मंडल कृषी अधिकारी बाबासाहेब तोरणे, विजय साळुंखे व नितीन शिंदे यांनी केली. तर खताचे वाटप खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कऱ्हाड पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी भूपाल कांबळे उपस्थित होते. यावेळी खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करुन व उत्पादन वाढ करावी, असे आवाहन केले.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. मंगलाताई गलांडे, सदस्य उत्तमराव पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, उंडाळे मंडल कृषी अधिकारी जगताप, कृषी पर्यवेक्षक नितीन शिंदे, कृषी अधिकारी बाबासाहेब तोरणे, विजय साळुंखे, तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी भुपाल कांबळे यासह कृषी विभागातीलअधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT